24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूररस्त्यावरील बेवारस वृध्दास मिळाले जीवदान

रस्त्यावरील बेवारस वृध्दास मिळाले जीवदान

एकमत ऑनलाईन

रेणापूर : सगळीकडे वाहनाची मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्याने रस्त्याच्या आजुबाजूला असलेल्या व्यक्तीकडे कोणाचेच लक्ष नसते. रेणापूर ंिपपळफाटा येथे वयोवृद्ध व अनोळखी व्यक्ती रस्त्याच्या कडेला फणफणलेल्या तापेने उपचाराविना विवळत असल्याचे कळताच राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष बालाजी कदम यांनी भल्या पहाटे त्या वयोवृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्या वयोवृद्धाला जीवदान मिळाले.

रेणापूर ंिपपळफाटा चौकात रात्र-दिवस वाहनाची मोठी वर्दळ असते. या चौकात एकमेकाकडे लक्ष देण्यास तयार नसतात. गेल्या दोन दिवसांपूर्वी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ंिपपळफाटा येथील एका बॅकेसमोर वृध्द गृहस्थ एकाच जागेवर पडून व फणफणलेल्या तापेने उपचाराविना विवळत असल्याचे रेणापूर येथील समाधान डावळे, सुभाष शिंंदे, जयदीप बोडके यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ सामाजिक , धार्मिक, राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बालाजी कदम याना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बालाजी कदम यांनी माणुसकीपणा दाखवून भल्या पहाटे घटना स्थळी यूऊन ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करून रुग्णवाहिका बोलावून त्या वयोवृद्धाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नाकर तांदळे यांनी त्याच्या प्राथमिक उपचार करून पुढील उपाचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पाठविले. वेळीच उपचार मिळाल्याने वयोवृद्धाला जीवदान मिळाले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष बालाजी कदम , डॉ. तांदळे, रुग्णवाहिका चालक विलास गिरी यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या