30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home लातूर बीड जिल्ह्यातील गेवराईनजीक कन्टेंनर-कारचा भीषण अपघात; वंचितच्या जिल्हाध्यक्षासह चार जण ठार

बीड जिल्ह्यातील गेवराईनजीक कन्टेंनर-कारचा भीषण अपघात; वंचितच्या जिल्हाध्यक्षासह चार जण ठार

एकमत ऑनलाईन

रेणापूर : (सिद्धार्थ चव्हाण) बीड जिल्ह्यातील गेवराईपासून दोन किलोमीटर अंतरावर कार व ऑईल कन्टेनरचा भीषण अपघात होऊन कारमधील पाच जणांपैकी तिघे जण जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील एकाची प्रकृतीचिंंताजनक आहे. मृतामध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष प्रा.सदशिव भिंगे यांचा समावेश आहे. अपघातात मरण पावलेले चौघे जण रेणापूर तालुक्यातील असून यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

गुरुवारी (दि.२६) पहाटे ६ वाजता कामखेडा (ता.रेणापूर) येथून राम देविदास भिंंगे यांच्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी एम.एच. ४६ बी ९७०० या क्रमाकांच्या कारमधून औरंगाबादकडे जात होते. या कारमध्ये राम भिंंगे यांचा भाऊ प्रा.सुभाष देविदास भिंगे, सदाशिव दिगंबराव भिंगे चुलत भाऊ, व्यकंट गुडदे (मावस भाऊ) महादेव लक्ष्मण चपटे (मेहूणा ) यांचा समावेश होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गेवराईपासून दोन किलोमीटर अंतरावर सदर कारचे आचानक टायर फुटले त्यामुळे कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर कार दुभाजक ओलंडून विरूध्द दिशेला पडली. याच दरम्यान औरंगाबादकडून येणा-या ऑईल कंटनेर कारला येऊन धडकला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात जखमी झालेले राम देविदास भिंंगे हे ग्रामपंचायतचे सदस्य व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असून त्यांना दोन मुली आहेत. याच्या एका मुलीसाठी मुलगा पाहण्यासाठी औरंगाबादला जात होते. प्रा. सदाशिव भिंंगे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. प्रा सुभाष भिंगे यांना दोन मुली आहेत. व्यकंट संभाजी गुडदे मुखेड येथील संस्थेत शिक्षक असून त्यांना दोन मुले आहेत. महादेव लक्ष्मण चपटे हे बावची ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

रेणापूर तालुक्यात तालुक्यात हळ-हळ
अपघातामध्ये रेणापूर तालुक्यातील चौघे जण मरण पावल्यामुळे तालुक्यात हळ-हळ व्यकत केली जात आहे. या गंभीर अपघाताची माहिती मिळताच कामखेडा (ता.रेणापूर ) येथील विलास धावणे, संजय गुडे, मल्हारी बोडके, अंगद जोगदंड, राजाभाऊ भिंगे हे कारने दुपारी अडीच वाजता घटनास्थळी पोहचले. मयताचे शवविच्छेदन झाल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांना त्याच्या मुळगावाकडे आणून शुक्रवारी दि. २७ नोव्हेबर रोजी अंन्त्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती विलास धावणे यांनी दिली.

नांदेडात वीज बिलाच्याविरोधात मनसेचा आक्रोश मोर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या