22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरलातूर शहरात नव्याने कोरोना बाधित आढळला

लातूर शहरात नव्याने कोरोना बाधित आढळला

एकमत ऑनलाईन

लातूर :  विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 28.05.2020 रोजी एकुण 144 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील पॉजिटीव्ह आलेली व्यक्ती हि मोती नगर लातूर येथील रहिवासी असून त्यास सद्यस्थितीत संस्थेच्या कोरोना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली.

  • उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 08 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 08 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
  • चाकुर येथुन 03 व्यक्तींचे स्वॅब तपासीसाठी आले होते त्यापैकी तिन्ही व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
  • निलंगा येथील 03 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
  • अहमदपुर येथील ०९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
  • जळकोट येथुन ०५ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ०५ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
  • कोव्हिड केअर सेंटर, लातुर येथुन 08 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी आले होते त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 02 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत

    असे लातुर जिल्हयातील असे एकुण 59 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 56 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 02 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आहेत.

तसेच बीड जिल्हयातील 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 05 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद जिल्हयातील 44 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 32 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 09 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.

असे एकुण आज 144 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 124 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 05 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातुर 59 पैकी 56 निगेटीव्ह व 01 पॉझिटिव्ह 02 (Inconclusive)
उस्मानाबाद 44 पैकी 32 निगेटीव्ह 09 पॉझिटिव्ह 03 (Inconclusive)
बीड 41 पैकी 36 निगेटीव्ह 05 पॉझिटिव्ह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या