22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरऔरादमध्ये पुन्हा एक पॉझिटीव्ह रुग्ण

औरादमध्ये पुन्हा एक पॉझिटीव्ह रुग्ण

एकमत ऑनलाईन

निलंगा : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे आठवडयाच्या विश्रांती नंतर पुन्हा कोरोना पॉजिटीव्ह रूग्ण निघाल्याने कंटेन्मेंट झोनची संख्या सात झाली आहे. आज एक कंटेन्मेंट झोन कमी झाला तर नविन वाढ झालेली आसुन आता पाच कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत तर नऊ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

औराद शहाजानी येथे दि २४ जुलै रोजी पुन्हा एक कोरोना बाधीत रूग्ण वाढला आहे. प्रशासनाने तात्काळ बाधीत मारवाडी गल्ली हा भाग कंटेन्मेंट झोन जाहिर करून सिल केला आहे. यावेळी वैद्यकिय अधीकारी डॉ़ डि़ एस़ कदम, मंडळ अधिकारी सोनकांबळे आदींसह वैद्यकिय कर्मचारी, पोलिस कर्मचारी व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होत.

आज कंटेन्मेंट झोन मधील १४ घरातील नागरिकांना कॉरंनटाईन करण्यात आले आहे. तर नविन बाधीत रुग्ण निघालेल्या भागातील चौदा घरातील ११ हायरिस्क लोकांना विलगिकरण कक्षात तर ६२ लोकांना होम कॉरंनटाईन करण्यात आल्याचे डॉ़ डी. एस. कदम एकमातशी बोलतांना म्हणाले.

Read More  बालपणाची निरागसता स्वभावात आणता येईल का?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या