36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरगुळखेड्यात कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण आढळला

गुळखेड्यात कोरोनाचा पॉझीटीव्ह रुग्ण आढळला

एकमत ऑनलाईन

औसा : कोरोना व्हायरस विषाणूंच्या महामारीमुळे संसर्ग होण्यापासून प्रशासन बचाव जनजागृती करीत असताना औसा तालुक्यातील गुळखेडा येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने, बाधित रुग्णाच्या घराचा परिसर आरोग्य विभाग आणि प्रशासनाकडून दि. १५ जुलै बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सील करण्यात आला असून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

सदर बाधित रुग्णाचा अपघात झाल्याने त्याला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कोरोनाची चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझीटीव आला आहे.

दरम्यान सदर व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव येताच बुधवारी सकाळी आरोग्य विभागासह, अधिकारी व प्रशासकीय अधिकारीसह औसा तहसीलदार शोभा पुजारी यांनी तातडीने भेट देत परिसर सील केला आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे असून १० जणांना संस्थात्मक तर ९८ जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यावेळी औशाचे तहसीलदार शोभा पुजारी, गट विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर आर शेख, डॉ.रेवणनाथ देवणीकर ग्रामसेवक, सरपंच, आशा कार्यकर्तींची उपस्थिती होती

देवणी तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी
तालुक्यातील विळेगाव येथील ६७ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा शुक्रवारी दि १७ जुलै रोजी सकाळी मृत्यू झाला.
देवणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तालुका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहून स्वत: व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन वारंवार करूनही नागरिकांच्या दुर्लक्षामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.

देवणी तालुक्यातील बोरोळ तीन, विळेगाव दहा, वलांडी चार, हंचनाळ नऊ,संगम एक,लासोणा एक तळेगाव एक असे एकूण २८ रूग्णांवर देवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.तर एका रूग्णांला उपचारानंतर घरी पाठविले आहे तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. देवणी येथील कोविड केअर सेंटरला निलंगा उपविभागीय अधिकारी विकास माने, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी करून आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.या वेळी तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, डॉ.कालीदास बिरादार आदी उपस्थित होते.

Read More  द्युतीवर ओडिशा सरकारची नाराजी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या