33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home लातूर शहरात अंडरग्राऊंड वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव तयार करावा

शहरात अंडरग्राऊंड वीजवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव तयार करावा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यातील वीज पुरवठा नियमित करावा कमीतकमी वेळेत रोहीत्र दुरुस्त करुन दयावेत, रब्बी हंगामात शेतक-यांना वीजपुरवठा बाबत कोणतीही अडचण येऊ नये, अशी व्यवस्था उभारावी अशा सुचना करुन लातूर शहरातील वीज वाहिन्या अंडरग्राउंड करण्याबाबत आराखडा आणि प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी आढावा बैठकी दरम्यान दिले आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी लातूरच्या शासकीय विश्रागृहावर महावितरण कंपनी अधिका-यांसोबत जिल्ह्यातील वीजव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत महावितरणकडून लातूर जिल्ह्यातील वीज वितरण व अन्य कामाची माहिती घेण्यात आली.

यावर्षी समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतक-यांना पाणी उपलब्ध होणार आहे. या पाण्याचा उपसा करण्यासाठी शेतक-यांना त्यांच्या कालावधीत अखंडीत वीज पुरवठा होईल यांची दक्षता घ्यावी. ऑईल उपलब्ध नाही म्हणून रोहीत्र दुरुस्तीचे काम रखडू नये. रोहीत्र दुरुस्त करणा-यांवरच ऑईल उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सोपवावी, अशी सुचनाही त्यांनी केली.

लातूर महापालीका सोलार प्रकल्प उभारणीचे नियोजन करीत आहे. त्यासाठी महावितरणने तांत्रीक माहीत आणी सहकार्य करावे, अशी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी केली. या बैठकीस मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, अभय साळुंके, विजय निटुरे, दगडूसाहेब पडिले, आयुक्त देविदास टेकाळे, महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर. कांबळे, अधीक्षक अभियंता एस. जी. कटके, लातूर मंडळ अधीक्षक अभियंता व्ही. आर. ढाकणे, कार्यकारी अभियंता मदन सांगळे यांची उपस्थिती होती.

नियमित वीजपुरवठ्याची दक्षता घ्यावी
लातूर जिल्ह्यातील वीजवीतरणाचे जाळे, एकुण व्यवस्था यांची माहीत घेतल्या नंतर जिल्ह्यात अखंडीत वीज देण्यासाठी आणखी उभारावयाच्या व्यवस्थे बाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यातील हॉस्पिटल, उद्योग, व्यवसाय यांना नियमीत वीज पुरवठा व्हावा याची दक्षता घेण्याची सुचनाही त्यांनी केली.

गणेशोत्सवात सांस्कृतिक ऐवजी सामाजिक उपक्रम राबवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या