24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरलातुरात साकारली रायगडावरील राजदरबाराची प्रतीकृती

लातुरात साकारली रायगडावरील राजदरबाराची प्रतीकृती

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील संभाजी नगर भागात ऐन दिवाळीत एक वेगळीच रेलचेल दिसून आली. अनेक पालक आपल्या पाल्यांसह, सहपरिवार छत्रपती शिवरायांचा रायगडावरील राजदरबार पहाण्यासाठी येत होते. कोरोनाचा पार्श्वभूमीवर सरकारने गड किल्ले बंद ठेवले होते. यामुळे अनेकांना रायगडावर दर्शनास जाता येत नाही. म्हणून शिवशाहीर संतोष साळुंके व त्यांच्या परिवाराने दिवाळी निमीत्त रायगड किल्यावरील छत्रपती शिवरायांचा राजदरबाराची हुबेहूब प्रतीकृती बनवली व शिवभक्तांना रायगड दर्शनाची अनुभूती दिली.

या देखाव्यात मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत, आद्यशाहीर आगीनदास डफावर थाप देत आहेत अन् कुस्त्यांचा फड रंगलाय, बुरजावर थांबुन मावळे टेहळणी करत आहेत, दहीदुध घेऊन गवळणी गडावर निघाल्या आहेत, जंगलामध्ये वाघ, सिंह,बिभट्या अशा हिंस्र पशुंचा वावर, पाणवठ्यावर जमलेले गाय, बैल इ.पशु अशी अनेक दृश्य उपस्थितांच्या मनास आकर्शीत करत होती. शिवशाहीर संतोष साळुंके यांच्या संकल्पनेतील ही कलाकृती तयार करण्यासाठी वरद जयदिप साळुंके, वेदिका जयदीप साळुंके, पुष्पावती रामकृष्ण साळुंके,सौ.उमा ,प्रा.डाॅ जयदिप साळुंके , धनंजय वीर, ज्योतिबा बडे सर्व साळुंके परिवाराने परिश्रम घेतले.

दिवाळीत किल्ले बनवण्यामुळे लहान मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाबद्दल विशेष आकर्षण निर्माण होते तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो अशा प्रथा लातूर परिसरात दिसून येत नाही अशा प्रकारची सकारात्मक विचार देणारी पद्धत सर्वत्र असायला हवी असे साळुंके परिवारास वाटते म्हणून त्यांनी ही कलाकृती साकार केली.

साळुंखे यांनी बनवलेल्या शिवरायांच्या राजदरबारा चे दर्शन घेण्यासाठी औशाचे आमदार अभिमन्यु पवार, महाराष्ट्र विकास आघाडीचे अॅड. मंचकराव डोणे. कपडा बँकेचे संचालक सुनील कुमार डोपे, रयत प्रतिष्ठानचे रामदास काळे, प्रा डॉ संदीप जगदाळे, पत्रकार प्रा.विनोद चव्हाण,पुरुषोत्तम माने, प्रा विवेक सौताडेकर,मनोज शिवलकर ,अजय घोडके, हरीश कुलकर्णी. आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

पहिल्यांदाच बिहार कॅबिनेट मुस्लिम मंत्र्याविना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या