23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeलातूरआजादी गौरव पदयात्रेतून देशभक्तीचा झंझावात

आजादी गौरव पदयात्रेतून देशभक्तीचा झंझावात

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर शहरात चौथ्या दिवशीही आजादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरुवात दि. १२ ऑगस्ट रोजी शहरातील दयानंद महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून झाली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या सहभागाने निघालेली ही आजादी गौरव पदयात्रा देशभक्तीचा झंझावात ठरली.

भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ब्रिटीश सत्तेच्या विरुद्ध मोठा लढा उभा केला होता. या चळवळीत अनेक नेत्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. भारत देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनतेच्या हिताची धोरणे राबवून सक्षम, बलशाली राष्ट्र उभा केले. काँग्रेस पक्षाने सर्वधर्म समभावाची ध्येयधोरणे आखली, देशाला विकसीत केले. या लढयाचे स्मरण लोकांना व्हावे या करीता आजादी अमृत महोत्सव गौरव यात्रा लातूर शहरातील विविध प्रभागात काढण्यात येत आहे. आजादी गौरव पदयात्रेची चौथ्या दिवसाची सुरुवात शुक्रवारी लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय प्रवेशद्वारापासून करण्यात आली. खाडगावर रोड, प्रकाशनगर, सोनानगर यामार्गे ही पदयात्रा पाच नंबर चौकात पोहोचल्यानंतर तेथे समारोप करण्यात आला. या पदयात्रेत लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, लातूर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा प्रा. डॉ. स्मिता खानापुरे, सपना किसवे, विजयकुमार साबदे, कैलास कांबळे, सूर्यकांत कातळे, इम्रान सय्यद, अ‍ॅड. देविदास बोरुळे पाटील,

प्रा. प्रवीण कांबळे, जालिंदर बर्डे, दत्ता सोमवंशी, अविनाश बट्टेवार, बाळासाहेब देशमुख, आयुब मणियार, धोंडीराम यादव, सचिन गंगावणे, धनंजय शेळके, संजय ओव्हाळ, कुणाल श्रीनंगारे, युनूस मोमीन, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, आसिफ बागवान, विकास वाघमारे, सिकंदर पटेल, पंडित कावळे, भालचंद्र सोनकांबळे, सुलेखा कारेपूरकर, स्वाती जाधव, दिपीका बनसोडे, सायरा पठाण, मंदाकिनी शिखरे, मीना टेकाळे, सुरेखा गायकवाड, अभिषेक पतंगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, आसिफ तांबोळी, सिद्धांत कांबळे, महेश शिंदे, राजू गवळी, संदीपान सूर्यवंशी, राजाभाऊ गायकवाड, विकास कांबळे, किरण बनसोडे, गोविंद केंद्रे, आकाश मगर, कुणाल वागज, पवन सोलंकर, विष्णुदास धायगुडे, श्रीकांत गर्जे, अजय वागदरे, बिभीषण सांगवीकर, अराफत पटेल, इसरार पठाण, दिनेश गोजमगुंडे, शेख अब्दुल्ला, अमोल गायकवाड, धनराज गायकवाड, नागनाथ डोंगरे, राजेश गुंठे, बाप्पा मार्डीकर, युसूफ शेख, विजय टाकेकर, अशोक भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या