27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeलातूरदोन लाख लोकसंख्येला एकच आधार केंद्र

दोन लाख लोकसंख्येला एकच आधार केंद्र

एकमत ऑनलाईन

उदगीर : बबन कांबळे
शहर व परिसराची लोकसंख्या किमान दोन लाखापेक्षा अधिक आहे परंतु लोकसंख्येच्या मानाने शहरात एकच नवीन आधार कार्ड काढण्याचे केंद्र सुरू असून त्याच्याकडे दोन किट सध्या अस्तीत्वात आहेत. या एकाच आधार केंद्रावर शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या भागातील नागरिकांना नवीन आधार कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी जळकोट, देवणी, लातूर यासारख्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड बनवावे लागत आहे. त्यामुळे उदगीर व परिसरातील लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या मुळे नागरीकांत तीत्र असंतोष पसरला आहे.

मागील दोन वर्षा पूर्वी उदगीरच्या कांही आधार केंद्र चालकांनी उदगीरच्या किटचा दुरुपयोग करून त्याला बाजूच्या तेलंगणा राज्यात जाऊन तेथून आधार कार्ड काढून दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे तत्कालीन उपजिल्हाधिकारी डॉ. अरंिवंद लोखंडे यांच्या आदेशान्वये शहरातील सर्वआधार केंद्रातील लॅपटॉप चौकशीसाठी जप्त करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच आधार केंद्र व आपले सरकार केंद्रला टाळे बसले होते. या घटनेला आता दोन वर्षापेक्षाचा अधीकचा काळ झाला आहे. संबंधीत केंद्र चालकांविरूध्द शहर पोलिस ठाण्याात गुन्हा देखील झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य झाले आहे. तसेच आधार कार्डातील दुरुस्त्या करण्यासाठी आधार केंद्राची गरज असते पण उदगीर येथील सर्वच आधार केंद्र बंद करण्यात आल्याने येथील विद्यार्थी,वरिष्ठ नागरिक तसेच सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आधार केंद्रामधून नवीन आधार कार्ड काढण्यासाठी शहरातील नगरपालिकेच्या कार्यालय खाली असलेल्या एकाच केंद्रात दोन किट सध्या उपलब्ध आहेत.

एकाच ठिकाणी शहरातील व परिसरातील नागरिकांची गर्दी वाढत असल्याने दिवसातून जर नेटवर्क चालले तर पंचवीस ते तीस नवीन आधार कार्ड तयार होत आहे .परंतु सध्या शाळा व कॉलेजसाठी आधार कार्ड ची गरज पडत असल्याने अगदी सकाळपासूनच या एकाच केंद्रावर नागरिक थांबून राहत आहेत .महिला मोठ्या प्रमाणे येत असल्याने त्यांना बसण्यास जागाही नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे .सरकार मान्य १८ सेवा केंद्रात केवळ नावात दुरुस्ती ,किंवा अपडेट करता येते परंतु अधिकचे पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत असल्यामुळे या एकाच केंद्रावर संपूर्ण शहराचा भार पडला आहे .याबाबत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लक्ष देऊन उदगीर व परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या