औसा : जग बदलत असताना शिक्षण प्रणाली विकसित होत असून खरा हाडाचा शिक्षक स्वत:च्या वागण्यातून कृतीतून आदर्श शिक्षक बनू शकतो. भादा सारख्या परिसरात शाळा घडवण्याचे कार्य कवी भारत सातपुते यांनी केले असून हे करीत असताना एकाच वेळी १५ पुस्तके प्रकाशन करणारे म्हणून त्यांची नोंद ग्रीनिज बूकात होईल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले.
औसा तालुक्यातील भादा जिल्हा परिषद शाळेत आयोजीत १५ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते पार पडल.ा. त्यावेळी ते बोलत होत. तसेच शाळेतील संगणक कक्षाचा व वृक्षारोपणचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, धनंजय देशमुख, कवी भारत सातपुते, नाथसिंह देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले उपस्थित होते.
भादा जिल्हा परिषद शाळा आज राज्याच्या टॉप टेन असलेल्या मोजक्या शाळेत झेप घेत असल्याचे सांगून देशमुख म्हनाले की, भारत सातपुते यांनी शाळेत शैक्षणीक उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबवत वृक्ष, योगासन, व्यायाम, क्रीडा, संगणक याचेही शिक्षण देवुन विद्यार्थ्याना घडवण्याचे कार्य केले. या चांगल्या कार्यासाठी भादेकर कायम पाठीशी खंबीरपणे उभे राहीले याचाही उल्लेख करत ग्रामस्थांचे कौतुक केले. लेखक होण्यासाठी चौफेर नजर बुध्दी लागते. त्याचबरोबर भांडार लागते. त्यापेक्षा संवेदनशील मन लागते असा हा कवी भाद्यात आमच्यात आहे, असे सातपुते यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी कवी सातपुते म्हणाले लेखन, शैक्षणीक क्षेत्रात देशमुख कुटुंबाचे नेहमी सहकार्य राहिले आहे. चांगले कार्य करणा-या प्रत्येक लातूरकरांना देशमुख परिवाराने त्यांचे कौतुक केले असून सतत सहकार्य करण्याची भावना ठेवलेली आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, संभाजी सुळ, हरिराम कुलकर्णी, प्रा. सुधीर पोतदार, सचिन दाताळ, रामदास पवार, सतीश पाटील, बालाजी साळुंके, सदाशिव कदम, महादेव खिचडे, सरपंच सौ दरेकर, उपसरपंच बालाजी शिंदे, सूर्यकांत पाटील, राम पाटील, सोसायटीचे चेअरमन दत्तप्रसाद शिंदे, मुख्याध्यापक मोहन माकणे, इस्माईल मुलाणी, नागेश पाटील, प्रा. भास्कर बडे, प्रा. साखरे, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.