23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरदुर्मिळ रंगीत करकोचा पक्ष्यांच्या वसाहतीला भेट

दुर्मिळ रंगीत करकोचा पक्ष्यांच्या वसाहतीला भेट

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका गावातील तलावाच्या पाणथळ क्षेत्रात नुकत्याच आढळलेल्या दुर्मिळ रंगीत करकोचा (चित्रबलाक) पक्ष्यांच्या वसाहतीला राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भेट देवून पक्षांचे निरीक्षण केले. आपल्या भागात आढळलेल्या या पक्षांचे व अन्य वन्यजीवांचे जतन, संवर्धन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भाने जैवविविधता समितीचे सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व स्थानिक शेतक-यांशी यावेळी चर्चा केली.

सदरील तलावाच्या पानथळ परिसरात वन्यजीव छायाचित्रकार धनंजय गुट्टे यांना रंगीत करकोचा पक्ष्यांची मोठी वसाहत आढळली. त्यानंतर बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी)चे उपसंचालक राजू कसंबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, जैवविविधता समितीचे सदस्य शहाजी पवार, धनंजय गुट्टे, वन परिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार यांनी या वसाहतीस प्रत्यक्ष भेट देवून पक्ष्यांची गणना केली.

या गणनेनुसार सध्या येथे सुमारे २५० रंगीत करकोचे त्यांच्या ४०० पेक्षा अधिक पिलांसह राहत असल्याचे अधिका-यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या संख्येने ही पक्षी येथे राहत असल्याबद्दल आमदार धिरज देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी येथील स्थानिक शेतक-यांशी चर्चा करून याबद्दल जाणून घेतले. मासे, बेडूक यांसह शेतातील गोगलगाय वा अन्य कीटक हे पक्षी खात असल्याने या पक्षांचा
उपद्रव नसल्याचे शेतक-यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या