27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरनदीवाडीतील तरुणाचा बुडून मृत्यू

नदीवाडीतील तरुणाचा बुडून मृत्यू

एकमत ऑनलाईन

देवणी : देवणी-निलंगा तालुक्याला सिमावर्ती भागाला जोडणा-या मांजरा नदी पात्रात पूला अभावी धनेगाव-हंचनाळ दरम्यान नदी पात्रातील टोक-याजवळ नदीवाडी येथील एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयत झालेल्या तरुणाचे नाव स्वप्नील राजेंद्र पाटील वय ३० वर्षे असून हा तरुण मंगळवारी शिऊर, धनेगाव येथे काही कामानिमित्त गेला होता. सायंकाळी उशिरा परत नदीवाडी या गावी येत असताना हंचनाळजवळ टोक-याजवळ आले असता नदी पात्रात पाण्याची धार सुरू असल्याने सदरील टोकरा बंद ठेवण्यात आला होता.

त्यामुळे नदी पात्रातून जात असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा नागरिकांचा प्राथमिक अंदाज आहे. मांजरा नदीपात्रातून देवणी तालुक्यातील धनेगावला जाण्यासाठी हंसनाळ, नदीवाडी, चिचोंडी, होसूर, हलगरा येथील नागरिक विद्यार्थी दररोज ये-जा करीत असतात. या मार्गावर मांजरा नदी पात्रावर पूल नसल्यामुळे नागरिक टोक-यातून नदीतून ओढ्यातून रस्ता काढत पुढे जातात आणि यामुळे दरवर्षी अनेक नागरिकांचे निष्पाप बळी जात आहेत. मांजरा नदीवर पूल व्हावा म्हणून यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हंचनाळ नदीवाडी, धनेगाव येथील नागरिक प्रयत्न करतात प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही जाग येत नाही. या घटनेची दखल घ्यावी आणि मांजरा नदी पात्रावर पूल बांधावा. अशी मागणी होत आहे, असे हंचनाळ येथील सरपंच मधुकर थोटे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या