25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरकिसान बँक स्टाफ गणेश मंडळांची माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती

किसान बँक स्टाफ गणेश मंडळांची माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती

एकमत ऑनलाईन

लातूर :किसान बँक स्टाफ गणेश मंडळद्वारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात गणेश उत्सव २०२२ निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी गणेशाची आरती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विविध मान्यवर, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी गणेश मंडळाने केलेल्या सजावट कौतुक केले.

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, जिल्हा बँकेचे संचालक संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक अशोक गोविंदपूरकर, जयेश माने, राजकुमार पाटील दिलीप पाटील नागराळकर, अनुप शेळके, मारोती पांडे, व्यंकटराव बिरादार, संचालिका सौ. स्वयंप्रभा पाटील, सौ. सपना किसवे, सौ. अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, सरव्यवस्थापक सी. एन. उगिले, तानाजी जाधव, उपसरव्यवस्थापक बी. व्ही. पवार, किसान बँक स्टाफ गणेश मंडळांचे सचिव सुनिल पाटील, सहसचिव सावता माळी, प्रभाकर केंद्रे, बंडू किसवे, मीडिया समन्वयक हरीराम कुलकर्णी, सचिन दाताळ, सतीश पाटील, बालाजी साळुंखे रामदास पवार, सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष लक्ष्मण मोरे, विकासरत्न विलासराव देशमखु मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोविंद डुरे, बँकेचे विविध खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी, महीला कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या