23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeलातूरआयमए वुमन्स विंगकडून लातूराच्या राजाची आरती

आयमए वुमन्स विंगकडून लातूराच्या राजाची आरती

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूरचा राजा गणपती गणेशोत्सव २०२२ अंतर्गत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिष्ठापणा करण्यात आलेल्या २५ फुटी पर्यावरणपुरक गणेशमूर्तीची आरती लातूर आयएमए वुमन्स विंगच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी राऊत यांच्या हस्ते विंगच्या सर्व डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आली. मंडळाच्या सामाजिक व पर्यावरण हितैषी उपक्रमांचे डॉक्टरांनी यावेळी स्वागत केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष हंसराज जाधव यांनी गणेशाची प्रतिमा व मानाचे उपरणे देऊन विंगच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी राऊत व उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले. गणेशोत्सव पर्यावरणानुकूल व अधिक लोकाभिमुख होणे ही काळाजी गरज असून लातुरचा राजा गणपती गणेशोत्सवांच्या पदाधिका-यांनी त्याची सुरुवात प्रत्यक्षरुपात केल्याबद्दल डॉ. शुभांगी राऊत यांनी मंडळाचे कौतूक केले. मंडळाचा हा उपक्रम दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी डॉ. श्वेता पवार. डॉ. मिनाक्षी पौळ पाटील, डॉ. शैला सोमाणी, डॉ. सारिका देशमुख, डॉ. माधुरी कदम. डॉ. सुजाता सारडा, डॉ. आरती झंवर, डॉ. रचना जाजू, डॉ. ज्योती सुळ, डॉ. सुवर्णा कोरे, डॉ. शिल्पा दडगे, डॉ. कल्पना किनीकर, डॉ. कल्पना जाजू, डॉ. निहारीका नागरगोजे, डॉ. वृषाली पाटील, डॉ. क्रांती साबदे, डॉ. विमल डोळे, डॉ. मनिषा बिराजदार, डॉ. साधना कनामे, डॉ. विद्या कांदे यांच्यासह शाम जाधव गौरव माकणे, प्रविण देशमुख, पुनम जाधव, पुनम पाटील, वैशाली लोंढे आदींसह मंडळाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या