24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरशहरातील ७७ हजार ५९७ घरांत अ‍ॅबेट मोहीम, धूर फवारणी

शहरातील ७७ हजार ५९७ घरांत अ‍ॅबेट मोहीम, धूर फवारणी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
डेंग्यु ताप प्रतिबंधात्म्क व नियंत्रणात्मक उपाय योजनेअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दि. २२ ते दि. २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये संपुर्ण शहरात अ‍ॅबेट मोहिम व धुरफवारणी मोहिमेचा पहिला राऊन्ड राबविण्यात येणार आहे. शहरातील एकूण अपेक्षीत घरसंख्या ७७ हजार ५९७ आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (पुरुष /स्त्रीया), आशा स्वतयंसेविकामार्फत घरोघरी जावून सांडपाण्याच्या टाक्यांतील पाणीसाठ्यात डासअळींची उत्प­त्ती झाली आहे का याची तपासणी करुन आरोग्य शिक्षण व आवश्यकतेनूसार अ‍ॅबेट टाकण्याची कार्यवाही करण्याच येत आहे. तसेच ज्यांचे घरी डासउत्पत्ती आढळून येईल त्यांना स्वतंत्र सुचनापत्र देण्यात येत आहे.

सध्या पावसाळयाचे दिवस असून डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने त्यामुळे डेंग्यु, चिकुनगुन्यां आजाराचा प्रार्दूभाव वाढण्याची शक्याता नाकारता येत नाही. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत विविध भागात कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी सर्व नागरीकांनी साठवलेले पाणी उघडे न ठेवता घट्ट झाकणाने सर्व पाणी टाक्या झाकून ठेवाव्यात. झाकण असलेल्याच टाक्यांचा वापर करावा. फुटक्या व झाकता न येवू शकणा-या टाक्या वापरु नयेत व त्या विल्हेसवाटीसाठी घंटागाडीकडे द्याव्यात. टाक्यांना झाकणे नसल्यास झाकणे बसवूण घ्यावीत. निरुपयोगी, भंगार साहित्य छतावर, अंगणात न ठेवता ते घंटागाडीकडे, भंगार विक्रेत्या­कडे द्यावे. नळाखाली, परीसरात खड्डे असल्यास बुजवून घ्यावेत.

साचलेले पाणीकाढून टाकावे किंवा साचलेल्या पाण्यात खराब ऑईल, तेल टाकावे. फुलदाणीतील पाणी नियमितपणे बदलावे. कुलर व फ्रिजच्या डिफ्रॉट प्लेटमधील पाणी नियमीत बदलावे. शरीर झाकण्यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत. डास चावू नयेत म्हलणून लहान मुला-मुलींना लांब बाह्याचे शर्ट व पॅन्ट, सलवार व कमीज, लेगीन्स या सारख्या् कपडयांचा वापर करावा. लहान मुलांना कोप-यामध्ये, पलंगाखाली, अंधा-या जागेत बसण्यास व खेळण्यासस प्रतिबंध करावा. खिडक्यांना जाळया बसवून घ्या­व्यात. सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. झोपतेवेळी मच्छंरदाणीचा वापर करावा. ताप आल्यास त्वरीत दवाखान्यायत तपासणी करुन घ्यावी व वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यांत येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या