27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeलातूरअबब....नांदेडात ५९१ जण कोरोना पॉझिटीव्ह

अबब….नांदेडात ५९१ जण कोरोना पॉझिटीव्ह

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाने मागील सर्व रेकार्ड मोडीत काढून शनिवारी नवीन ५९१ रुग्ण संख्या देत नवीन रेकार्ड निर्माण केले आहे. तर चार कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या एकाच एवढे रूग्ण आढल्याने नांदेडकर चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाची रूग्ण संख्या झपाटयाने वाढत आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या ३१२३ अहवालांमधील २५०२ अहवाल निगेटीव्ह आहेत, ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या २६३९१ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये २७९ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ३२१ असे एकूण ५९१ रुग्ण आहेत. आजच्या ५९१ रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात ४७३ रुग्ण आहेत. आज ४३० स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब १४ आहेत.

आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात २४५, लोहा ११,नांदेड ग्रामीण ७, हदगाव २, धमार्बाद १,हिंगोली १,परभणी १,भोकर १,देगलूर २, कंधार २,किनवट ३,मुदखेड १,लातूर १,नागपूर १ असे २७९ रुग्ण आहेत.आज प्राप्त झालेल्या अ‍ॅन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र २२८, नांदेड ग्रामीण १५,अधार्पूर ४, लोहा १३, बिलोली १,हदगाव २,किनवट १५, माहूर ९ , नायगाव २, हिंगोली १,यवतमाळ १,देगलूर ४,धमार्बाद ६, कंधार १, मुखेड ९,उमरी १,असे ३१२ रुग्ण
आहेत.

… तर शहरात सक्तीची संचारबंदी
शहरात पुन्हा दिवसागणीक कोरोना रुग्ण वाढत असून शनिवारी नांदेड शहराचा आकडा ४७१ वर पोहंचला आहे. शहराची परिस्थितही रुग्णांची संख्ख्या वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेडात दोन दिवसाची का होईना संचारबंदी लावावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनासह मनपा प्रशासन सातत्याने रस्त्यावर उतरुन काम करत आहे. नागरिकांना वारंवार सूचना देवूनही नागरीक ऐकण्यास तयार नाहीत. मराठवाड्यात गुरुवारी १ हजार ९९६ रुग्ण आढळले. त्यानंतर आजही दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढत आहे. त्यामुळे टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.खाटांची संख्या, कोरोना उपचार केंद्रातील सुविधा वाढवण्यात आल्या आहेत.

उद्योग आणि व्यापारी तसेच दुकानातील कर्मचा-यांना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. चाचणीच्या ठिकाणी गर्दी होवू नये यासाठी मनपा प्रशासन लक्ष घालत आहे. जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीतून वैद्यकीय सेवा आणि औषधी दुकाने, वृत्तपत्र वितरण आदी सेवांना वगळण्यात आले आहे. शहरात चाचणीचे प्रमाण वाढविले असून मुखपट्टीविना फिरणा-यावर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर साथरोग कायद्यान्वये असलेले नियम तोडून फिरणा-यांवर देखरेख व कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासन तैणात करण्यात आले आहे. एकूण मनुष्यबळाच्या ७५ टक्के पोलिस आजघडीला रस्त्यावर उतरले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे हे सातत्याने सूचना देवून कर्मचा-यांकडून काम करुन घेत आहेत. मनपा आरोग्य प्रशासनाचे प्रमुख डॉ. बिसेन हे आपली टिम घेवून कार्यरत आहेत. मार्च महिना असतांनाही वसुलीकडे लक्ष देतत कर्मचा-यांना आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. नांदेडकरांनी वाढत्या आलेखावर त्रिसुत्री नियम पाळून अंकुश ठेवल्यास निश्चीतच कोरोनावर नियंत्रण आणता येईल. स्वयंस्फुर्तीने नागरिकांनी या त्रिसुत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.

बेकायदा डिझेल विक्री रॅकेटची कसून चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या