22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरपावसाच्या उघडिपीनंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग

पावसाच्या उघडिपीनंतर खरिपाच्या पेरण्यांना वेग

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्याने खरीपांच्या पेरण्यांना बे्रक लागला होता. संततधार पाऊस उघडताच शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३८२.३ मि.मी. पाऊस झाला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याची खात्री होताच शेतकरी खरीपाच्या पेरण्या करताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात आज पर्यंत ४ लाख २८ हजार ८४० हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ७२ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात संततधार पावसाच्या उघडीप नंतर खरीपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत आजपर्यंत ३८२.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर शेतक-यांनी चाढयावर मूठ धरली आहे. लातूर जिल्ह्यात ६ लाख १२ हजार ४२१ हेक्टरवर पेरणी होणार आहे. जिल्ह्यात कमी-जास्त स्वारूपात पाऊस पडत आहे. या पावसाच्या आधारवर ४ लाख २८ हजार ८४० हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा ३ लाख ५२ हजार ५९३ हेक्टवर झाला आहे. त्या खालोखाल तुरीचा ५३ हजार ९७३ हेक्टरवर, मूगाचा ४ हजार ८३१ हेक्टरवर, उडीदाचा ३ हजार १५३ हेक्टरवर, साळीचा १०१ हेक्टरवर, ज्वारीचा ४ हजार ८०४ हेक्टरवर, १२२ हेक्टरवर बाजरी, मकाचा १ हजार ७७८ हेक्टरवर, तीळ २४० हेक्टरवर, भुईमूग १६० हेक्टरवर, कारळ १६२ हेक्टरवर, तर ८ हेक्टवर सुर्यफुलाचा पेरा झाला आहे. तसेच ६ हजार १८८ हेक्टरवर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या