23.5 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home लातूर औशाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एसटी पलटी होवून एकाचा मृत्यू, 13...

औशाजवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एसटी पलटी होवून एकाचा मृत्यू, 13 प्रवासी जखमी

एकमत ऑनलाईन

औसा ( प्रतिनिधी ) औसा ते लामजना या राष्ट्रीय महामार्गावर वाघोलीपाटी जवळ एस .टी बस व ट्रकच्या अपघातात एस टी तील एका वयोवृध्द प्रवाशाचा मृत्यू झाला असून १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार दि. १० जानेवारी रविवार रोजी सकाळी दहाच्याच्या सुमारास येथे घडली आहे. यात एसटी चे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

याबाबतची माहिती अशी की राज्य परिवहन मंडळाच्या निलंगा आगाराची एस टी( क्र. (एमएच- २० बीएल-३९७३ ) प्रवासी घेऊन निलंगा ते अकोला प्रवासासाठी निघाली होती. औसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गवर वाघोली पाटी जवळ समोरहून ट्रक क्रमांक केए-५६ . २५९६ ने समोरुन येऊन राॕग साईडने बाजूला घासली गेली , यात एस.टी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली , यामध्ये एस.टी तील सर्व १४ प्रवाशी जखमी झाले .त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकिय रुग्णालय येथे उपचारासाठी पाठविले असता त्यातील व्यकंट हणमंत कलबोणे ( वय ६५ वर्षे रा.लिंबाळा ता निलंगा ) या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

जखमीमध्ये भरत कलबोणे रा.लिंबाळा ता .निलंगा हे गंभीर जखमी आहेत .तर परळी येथील कनक महेशकुमार तोष्णीवाल( वय १४ वर्ष ) व कोमल महेशकुमार तोष्णीवाल (वय ११ वर्षे ) व राजाबाई महारुद्र वारद( वय ५८,वर्षे ) रा.शारदानगर परळी व आरिफ रियाज शेख (वय ३१ वर्षे रा.लातूर एस.पी आॕफिसजवळ )व तांबरवाडी ता औसा येथील माडजे नामक प्रवाशांना गंभीर मार लागला आहे . घटनास्थळी महसूल, पोलिस, एसटीचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर , यंत्र अभियंता शितल बिराजदार, उप यंत्र अभियंता मुरलीधर जाधव , औसा आगार प्रमुख अजय गायकवाड , निलंगा आगार प्रमुख युवराज थडकर , औशाचे मुख्यलेखाकार मल्लिकार्जून निगुडगे , श्री होळकर, वाहतूक नियंत्रक एस एस परिहार हे घटनास्थळी उपस्थित झाले त्यांनी जखमींची चौकशी केली आहे. याप्रकरणी एस.टी चालक ज्योतीराम होनमाने यांनी ट्रकचालकाविरुध्द औसा पोलिसात तक्रार दिली आहे.

दुभंगलेल्या अमेरिकेचा परिपाक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या