जळकोट : जळकोट तालुक्यातील सोनवळा येथील वीस ते पंचवीस नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली होती . या सर्व रुग्णांवर जळकोट येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. आता ही गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आली आहे .
सोनवळा येथील नागरिकांना दि ५ जून व सात जून रोजी अचानक पोट दुखी- मळमळ असा त्रास सुरू झाला. यानंतर हे सर्व रुग्ण उपचारासाठी जळकोट येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले.उपचार पूर्ण झाल्यानंतर कांही रुग्ण बरे होऊन घरी परतले असून गावामध्ये अन्य कुठलेही गॅस्ट्रो सदृश रुग्ण आढळून आले नाहीत. येथील मुंडे गल्लीमध्ये असलेल्या हात पंपामधील पाणी प्यायल्यामुळे या रुग्णांना गॅस्ट्रो झाला होता .या हातपंपाच्या बाजूला घाण पाणी मुरून ते हातपंपातील पाण्यात मिसळले व ते पाणी पिल्यामुळे गल्लीतील नागरिकांना गॅस्ट्रो झाला. जिल्हा साथ अधिकारी श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वडगावे ,तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पवार यांनी सोनवळा गावास भेट देऊन , सदरील हातपंपाची पाहणी केली. या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा कार्यान्वीत ठेवण्यात आली आहे. यावेळी सोनवळा गावचे सरपंच राहुल सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती .
गॅस्ट्रोची साथ आटोक्यात
एकमत ऑनलाईन