21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरकार, दुचाकीसह आरोपी जेरबंद

कार, दुचाकीसह आरोपी जेरबंद

एकमत ऑनलाईन

उदगीर : उदगीर शहर आणि परिसरात नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि दुचाकींची चोरी करून त्या दुचाकी मोटार सायकल एक तर ग्राहकांना कमी किमतीत विकायच्याकिंवा मेकॅनिकलकडे सुटे भाग करून विकणा-या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर शहर डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. दि. ४ ऑगस्ट रोजी पथकास गोपनीय माहिती मिळाल्यानंतर नावंदी गाव व परिसरात चोरीच्या स्वीफ्ट डिझायरसह दुचाकी अतिशय कमी किमतीत लोकांना भूल थापा देऊन विक्री होत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणी संशयित आरोपी आकाश उर्फ लखन दयानंद माने वय वर्ष २७ नावंदी तालुका उदगीर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने उदगीर तालुक्यातील विविध ठिकाणाहून कार, दुचाकीची चोरी करून ग्रामीण भागात कमी किमतीत विकल्याचे सांगितले. त्याच्याकडून एक स्वीफ्ट डिझायर कार व दुचाकी जप्त केली. सदरची कारवाई उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार राम बनसोडे, राहूल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे यांनी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या