28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरघरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस सोन्याचे दागिने, रोख रकमेसह अटक

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस सोन्याचे दागिने, रोख रकमेसह अटक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे चाकूर यांच्या संयुक्त कारवाईमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस दोन दिवसातच अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील फिर्यादीच्या घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने दि. २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरून नेल्या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी चाकूर तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले होते. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करण्यात येत होते.

सदर संयुक्त पोलीस पथकाने गुन्ह्या उघडकीस आणण्याच्या दिशेने गुन्हेगारांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित संदिपान निवृत्ती कांबळे रा. नळेगाव ता. चाकूर यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली असता त्याने सदरचा घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल केले. गुन्ह्यात चोरलेला ३ लाख १० हजार रुपयाचा मुद्देमाल सोन्या-चांदीचे दागिने हजर केल्याने ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले असून दि. २६ ऑगस्ट रोजी नमूद गुन्ह्यात संदिपान कांबळे यास अटक करण्यात आलेली आहे. संयुक्त पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अवघ्या दोनच दिवसात आरोपीच्या मुसक्या आवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांचे नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील, पोलिस अंमलदार सुनील घोडके, सुग्रीव मुंडे, सूर्यकांत कोळेकर ,नागरगोजे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा, लातूरचे सफौ संजु भोसले, पोलिस अमलदार राम गवारे, सुधीर कोळसुरे, बंटी गायकवाड, सिद्धेश्वर जाधव यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या