37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeलातूरघरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पाच तासांत जेरबंद

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पाच तासांत जेरबंद

एकमत ऑनलाईन

लातूर : उपविभागीय पोलिस अधिकारी,लातूर शहर कार्यालयाच्या विशेष पथकाने तातडीने कार्यवाही करीत घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस पाच तासांत जेरबंद केले. त्याचाकडून १ लाख ३० हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. ६ मे ते १२ मे २०२२ च्या दरम्यान राधाकृष्णनगर, लातूर येथील एका घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे एकूण १ लाख ३० हजार रुपयांचे दागदागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले वगैरे तक्रारी अर्जावरुन पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे दि. १२ मे रोजी गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

सदर पोलीस पथकाने लागलीच नमूद गुन्हा उघडकीस आणण्याच्या दिशेने गुन्हेगारांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी रमेश राठोड, राहणार कोळगाव तांडा तालुका रेणापुर यास रिंग रोड, लातूर येथील एका गॅरेजमधून ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली तेव्हा नमूद आरोपीने सदरचा घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल करुन गुन्ह्यात चोरलेला १ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल सोन्या-चांदीचे दागिने हजर केल्याने ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले असून नमूद गुन्ह्यात रमेश राठोड यास अटक करण्यात आलेली आहे. विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अवघ्या ५ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, वाहिद शेख, पोलीस अंमलदार महेश पारडे, काकासाहेब बोचरे यांनी पार पाडली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या