31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरलातूर शहरात उद्योगांना दिलेले ५४ सिलेंडर अधिग्रहीत

लातूर शहरात उद्योगांना दिलेले ५४ सिलेंडर अधिग्रहीत

एकमत ऑनलाईन

लातूर : उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंड रिफिलिंग करण्यासाठी अधिग्रहीत करण्याचे आदेशा महानगरपालिका आयुक्तांनी देताच क्षेत्रीय अधिकारी यांनी शहरातील विविध गॅरेज, वेल्डिंग शॉपमधुन दि. २२ एप्रिल रोजी ५४ ऑक्सिजन सिलेंडर अधिगृहीत करण्यात आले. सदर सिलेंंडर रिफिलिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणात ऑक्सिजन बेडची मागणीही वाढली आहे. महानगरपालिकेने शहरात विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची सुविधा निर्माण केली आहे. परंतू, वाढत्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर शहराला मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो आहे. परंतू, ऑैिक्सजन बेडची मागणी अचानक प्रचंड प्रमाणात वाढली असल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता त्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंडर अधिगगृहीत करण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी झोनल अधिकारी समाधान सूर्यवंशी व त्यांच्या पथकाचे शहरातील उद्योजकांकडील ५४ ऑक्सिजन सिलेंडर अधिग्रहीत करुन ते रिफिलिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे लातूर शहराला ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. या ऑक्सिजनचा वापर करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर कमी पडत आहेत. त्यामुळे शहरातील उद्योजकांनी त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलेंडर महानगरपालिकेकडे जमा करुन कोरोना युद्धात आपलाही सहभाग नोंदवावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आयुक्तांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी
कोविड रुग्णालयांना ऑक्सिजन सिंिलडरचा तुटवडा भासत असल्यामुळे शहरातील जीवनावश्यक नसलेल्या उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंडर अधिग्रहीत करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल यांनी झोनल अधिका-यांना दिले आहेत. कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे शहरात ऑक्सिजन सिलेंडरची मागणी वाढली आहे. त्यामुळे उद्योगांना दिलेले ऑक्सिजन सिलेंडर अधिगृहित करुन कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन भरुन देण्याची व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे.

यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये शहरामध्ये जीवनावश्यक नसलेले उद्योग आणि त्यांचेकडे असलेले ऑक्सिजन सिलेंडर तात्पुरत्या कालावधीसाठी अधिगृहीत करुन जमा करावेत असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करुन संबंधितांचे व्यवसाय,दुकान उघडुन ऑक्सिजन सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन,तहसिलदार, लातूर यांच्याकडे आजच रिकामे ऑक्सिजन सिलेंडर जमा करावेत, असे आयुक्तांनी झोनल अधिका-यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

नांदेडात आज १ हजार २९३ जणांना रुग्णालयातून सुट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या