23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूरलातूर शहरात विनामास्क फिरणा-यांवर कारवाईचा बडगा

लातूर शहरात विनामास्क फिरणा-यांवर कारवाईचा बडगा

एकमत ऑनलाईन

लातूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संचारबंदी लागु करण्यात आली आहे. असे असतानाही काही जण शहरातील रस्त्यांवर विनामास्क फिरत आहेत. अशांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दि १५ मे पर्यंत संचारबंदी, वीकेंड लॉकडाऊनसह कडक निर्बंध जारी केले आहेत. तसेच दि. ६ ते १३ या कालावधीत आणखी कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.

या आदेशानूसार जिल्ह्यात फक्त वैद्यकीय सेवा सुरु राहणार असून इतर सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा बंद असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण विनामास्क रस्त्यावर फिरु नये, अनावश्यक गर्दी टाळावी, फिजिकल डिस्टन्सचा अवलंब करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, आदी सुचना वारंवार दिल्या जात असूनही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनूसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या अधिनस्त यंत्रणेमार्फत केली आहे.

गांधी चौक आणि परिसरात महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, स्वच्छता निरीक्षक अमजद शेख, रवि कांबळे, औसा रोड परिसरात मनपा क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पवर, स्वच्छता निरीक्षक रीव शेंडगे, सुपेकर, दत्ता हणमंते यांनी शनिवार व रविवारी असंख्ये आवाहनांवर दडात्मक कारवाई केली आहे.

एक हजार रुपये दंड
झोन डी चे झोनल आधिकारी बंडू किसवे व गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय हिबारे, सहायक पोलीस निरिक्षक लोंढे बोइनवाड यांच्या संयुक्त रविावारी गांधी चौकात दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनाकारण फिरणा-या नागरिकांची विचार पुस करुन यांच्यावर दंडत्मक कार्यवाही करण्यात आली. स्वच्छता निरिक्षक अमजद शेख, अमोल गायकवाड, विजय महाराज यांनी वाहनधारकांवर एक हजार रुपयांचा दंड केला.

पेटंटचे सोवळे, कोरोना अन् अर्थकारण!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या