22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeलातूरशहरात अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज, कमाणी लावणा-यांवर कारवाई होणार

शहरात अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज, कमाणी लावणा-यांवर कारवाई होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
उच्च न्याचयालयाच्या अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज, कमाणी बाबतचा आदेश दि. ३१ जानेवारी २०१७ आदेशानूसार शहरामध्ये अशा स्वन्रुपाची पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज, कमाणी लावणा-यां विरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विरुप्प्न प्रतिबंध कायदा १९९५ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत तरतुदीनुसार कार्यवाही करणेस्ताव उपायुक्त (सामान्य) यांची नोडल ऑफिसर क्षेत्रिय अधिकारी यांची क्षेत्रिय प्राधिकृत अधिकारी व स्वच्छता निरिक्षक यांची प्रभाग प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्तील करण्यात आली असुन अशा प्रकारच्या प्राप्ता तक्रारी विरुद्ध त्यांचेकडुन उचित कार्यवाही संबंधितावर करण्यात येणार आहेत.

शहरात अनाधिकृत जाहिराती, घोषना फलक, होर्डींग, पोस्टरर्स यांच्या संदर्भात जनहित याचिका क्रं. १५५/२०११ च्या बाबत न्यायालयाकडील आदेशानुसार अनाधिकृत जाहिराती, होर्डींग्ज, पोस्टर्स, घोषणाफलक यासंदर्भात आपली कोणतीही तक्रार असल्यास लातूर महानगरपालिकेच्या टोल फ्री नंबर १८००२३३१३८८ वर फोन करुन तक्रार नोंदवावी, आपल्या तक्रारीची दखल घेण्यात येईल. तसेच महानगरपालिकेने निश्चित करुन दिलेल्या जागेशिवाय इतर सार्वजनिक जागेवर व महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय कोणत्याही ठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज, कमानी लावु नयेत याचे उल्लंघन केल्यास प्रस्तुत कायदेचे अंतर्गत दंडनीय कार्यवाही करुन संबंधितांविरुध्द, पोलिस कार्यवाही करण्यात येणार आहे.

तेंव्हा महानगरपालिकेची रितसर परवानगी घेवुनच पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्ज, कमानी लावावेत परवानगी घेतल्यानंतर सदरील जाहिरातीवर महानगरपालिकेचा जाहिरात क्रमांक व दिलेला कालावधी दर्शविण्यात यावा. शहरातील राजकीय नोंदणीकृत पक्ष, राजकीय संघटना आणि सर्व नागरीकांना याव्दारे विनंती करण्यारत येते की, आपण शहरामध्ये वेगवेगळया कार्यक्रमानिमित्त लावावयाची पोस्टर्स, बॅनर्स, होर्डींग्जि, कमाणी उभारण्यापुर्वी रितसर संबंधित क्षेत्रिय कार्यालय मनपाची परवानगी घेवुनच उभारावेत. अनाधिकृत पोस्टर्स, बॅनर, होर्डींग्जं, कमानी लावण्यात येणार नाहीत व न्यानयालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेवुन महानगरपालिकेस, जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या