28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरआदर्श मैत्री फाउंडेशनने केली २५० वंचित कुटुंबाची दीपावली गोड

आदर्श मैत्री फाउंडेशनने केली २५० वंचित कुटुंबाची दीपावली गोड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असणा-या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजातील वंचित घटकातील गरजू, अनाथ लोकांसोबत दीपावली साजरी करत त्यांना दीपावली फराळ, अभग्यस्नान किट व साड्यांचे वाटप करण्यात आले. सुमारे २५० वंचित कुटूंबाची दीपावली गोड करण्यात आली. गेली ७ वर्षांपासून आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने शहरातील नागरिकास अवाहन करुन त्यांच्याकडून पेपर रद्दीचे संकलन करुन ती रद्दी विकून त्यातील जमा झालेल्या पैशामधून व आदर्श मैत्रीच्या संचालकाच्या सहकार्यातून दीपावली फराळ अभयग्सनं किट व साड्या बाभळगाव परिसरातील वैशालीनगर येथील २५० कुटुंबास वाटप करण्यात आले. या परिसराचा विकास हळू -हळू होत आहे. येथील सर्व झोपड्यांचे रुपांतर सिमेंटच्या पक्क्या घरामध्ये येणे गरजेचे आहे .हे परिवर्तन होण्यासाठी शिक्षण म्हत्वाचे आहे.

सोबतच येथील युवकांनी उद्योगात येणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व मार्गदर्शन व सहकार्य आम्ही करु, असे मत अभिजित देशमुख यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार म्हणाले, आपण सर्वजण आपली दीपावली थाटात साजरी करतो पण समाजातील काही घटक असा आहेत की त्यांना सणच माहित नाही. अशा वंचित घटकांसोबत दीपावली अगोदर साजरी करुन त्यांना फराळ वाटप, अभयग्यस्नान किट व साड्या भेट देऊन थांबणार नाहीत तर त्यांच्यात बदल घडवण्यासाठी या समाजाला पुढे येण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण आहे या परिसरातील मुलगा – मुलगी अशिक्षित राहू नये त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना प्राथमिक माध्यमिक शिक्षणाबरोबर उच्चं शिक्षणासाठी मदत आदर्श मैत्री फाउंडेशनच्या सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी प्रा. शिवराज मोटेगावकर, शशिकांत पाटील, तुकाराम पाटील, विवेक सौताडेकर आदिनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा ओमप्रकाश झुरुळे यांनी केले, या वेळी फाउंडेशनचे संचालक सचिदानंद ढगे, निलेश राजेमाने, विवेक ढगे, विशाल राठी, राघवेंद्र इटकर , प्रमोद भोयरेकर, दासराव शिरुरे, शशिकिरण भिकाने, कल्याण पवार, अनंत सूर्यवंशी, महेश शिंदे, प्रा उदय देशपांडे, प्रवीण सूर्यवंशी, संभाजी माळी, संभाजी नवघरे, श्रावण चव्हाण, असिफ शेख, अमोल जानते, मदन भगत, चंद्रशेखर गिरी, सूर्यकांत कठारे, येणगे, राहुल खुदासे, यांच्यासह आदर्श मैत्रीचे सर्व संचालक व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या