22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरअ‍ॅड. नंदकिशोर अग्रवाल यांना रोटरी भूषण पुरस्कार प्रदान

अ‍ॅड. नंदकिशोर अग्रवाल यांना रोटरी भूषण पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
रोटरी क्लब लातूरचा पारितोषीक वितरण सोहळा दि. २९ जून रोजी येथील हॉटेल एम्बेसी येथे झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असिस्टंट गव्हर्नर डॉ. सुचित्रा भालचंद्र होत्या तर अध्यक्षस्थानी पद्मभूमषण डॉ. अशोक कुकडे होते. ५२ वर्षांपासून रोटरी क्लब लातूर मध्ये सदस्य असलेले चार्टर मेंबर अ‍ॅड. नंदकिशोर अगरवाल यांचा रोटरी भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला व वर्षभर चांगले काम करणा-या सदस्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. कुकडे यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लबच्या कार्याचे कौतूक केले. डॉ. सुचित्रा भालचंद्र यांनी रोटरी क्लब लातूर चे काम संपूर्ण टीम करत असल्यामुळे डायनामिक क्लब आहे, असे गौरवोद्गार काढले. हरिप्रसाद सोमाणी यांनी पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा परिचय करुन दिला. प्रास्ताविक नानीक जोधवानी यांनी केले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे डिस्टिक ऑफिसर्स, माजी अध्यक्ष, सर्व सदस्य व त्यांच्या अ‍ॅनस सहित ७६ जणांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज धूत यांनी केले. रोटरी क्लबचे सचिव अ‍ॅड. जांबुवंतराव सोनकवडे यांनी आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या