22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आणखी १०१ रुग्णांची भर

लातूर जिल्ह्यात आणखी १०१ रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा कहर सुरू असून, गुरुवारी आणखी तब्बल १०१ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये काल तपासणीस आलेल्या स्वॅब नमुन्यातील ५० आणि रॅपिड टेस्टमधून सापडलेल्या ५१ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सलग दुसºया दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने लातूरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान, आज आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता ८९ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यातून बुधवारी ४३८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.

गुरुवारी प्राप्त अहवानुसार २४६ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ५० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच २१ जणांचा अहवाल प्रलंबित, ४५ जणांचा अहवाल अनिर्णित, तर ७६ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. यात ५० पॉझिटिव्हपैकी ४६ रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर ४ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी विविध ठिकाणी २६७ जणांची अ‍ँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. त्यात ५१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, सर्व रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. आजच्या एकूण १०१ रुग्णांमध्ये लातूर तालुक्यातील तब्बल ४७, औसा तालुक्यातील होळी-६, काझीगल्ली-५, केवळराम गल्ली-४, गणेशनगर-५, येल्लोरी-१, जावळी १ असे एकूण २२, अहमदपूर, उदगीर तालुक्यातील प्रत्येकी १०, शिरुर अनंतपाळ ९, चाकूर २ आणि रेणापूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज जिल्ह्यात १०१ रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या १९९२ वर गेली आहे. यातील ११८० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे, तर सध्या ७१३ रुग्णांवर उपचार विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यातील ६८७ रुग्णांची लक्षणे सौम्य, २३ जण आॅक्सीजनवर आणि १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यासोबतच आज ५७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामध्ये लातूरमधील ३९, उदगीर ९, औसा-७, चाकूर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

चार बाधितांचा मृत्यू
लातूर जिल्ह्यात गुरुवारी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये लातूर शहरातील प्रकाशनगर, भाग्यनगर या भागातील २, लातूर तालुक्यातील कासारगाव येथील एक आणि औसा तालुक्यातील उजनी येथील रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ८९ वर पोहोचली आहे.

लातूर तालुक्यातील रुग्ण
लातूर शहरातील प्रकाशनगर-५, वसवाडी-४,बाभळगाव-४, श्यामनगर २, त्रिमूर्तीनगर, माळी गल्ली, कव्हा रोड, नंदी स्टॉप, श्रीनगर, वाल्मिकीनगर ३, भाग्यनगर, बादाडेनगर, तिरुपतीनगर, श्यामनगर, आदर्श कॉलनी-२, होळकरनगर, सिद्धेश्वर चौक, मजगेनगर, मंठाळेनगर, विकासनगर, गांधीनगर, शिक्षक कॉलनी, विवेकानंद चौक, सूतमिल रोड, वैभवनगर, कपिलनगर, खाजगाव रोड, जिल्हा कारागृह, कासारगाव.

Read More  दिल्लीत नाइट कर्फ्यूही हटवला : हॉटेल्स सुरू होणार

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या