31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आणखी १६१ रुग्णांची भर

लातूर जिल्ह्यात आणखी १६१ रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या संख्येने सुरू असून, सलग दुस-या दिवशी नव्या रुग्णांचा आकडा दीडशेच्या पुढे गेला आहे. शनिवारी जिल्ह्यात १८८ रुग्ण वाढले होते. रविवारी आणखी १६१ रुग्णांची भर पडली. स्वॅब तपासणी आणि रॅपिड टेस्टमुळे रुग्ण वाढत असून, यातील तब्बल १४९ रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील आहेत, तर १२ रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे.

यामुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण रुग्णसंख्या २४६९ वर पोहोचली असून, त्यापैकी १३४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या १०२५ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी ९८३ रुग्णांची सौम्य लक्षणे आहेत. याशिवाय २६ ऑक्सिजनवर आणि १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातून शनिवारी तपासणीसाठी आलेल्या ३९७ स्वॅबचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. त्यातील २५७ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ९० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील ४५ जणांचा अहवाल अनिर्णित, तर ५ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. यासोबतच रविवारी ५८१ जणांची रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी ५१० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ७१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. स्वॅब तपासणी आणि रॅपिड अ‍ँटिजन टेस्ट यामुळे जिल्ह्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. रॅपिड अ‍ँटिजन टेस्टमध्ये टीएचओ औसा येथे सर्वाधिक १७ रुग्ण सापडले. तसेच ग्रामीण रुग्णालय औसा-५, यासोबतच महापालिका सेंटरमध्ये ११, टीएचओ लातूरमध्ये ७, मुला-मुलींच्या वसतिगृह ७, सामान्य रुग्णालय उदगीर-११, ग्रामीण रुग्णालय रेणापूर ६, भातांगळी १, ग्रामीण रुग्णालय चाकूर-१, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर-१, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव-१, स्त्री रुग्णालय लातूर -१ असे रुग्ण सापडले आहेत.

६० रुग्णांना डिस्चार्ज
ळजिल्ह्यात मागच्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यासोबतच ब-या होणा-या रुग्णांची संख्याही ब-यापैकी आहे. रविवारी जिल्ह्यात ६० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. त्यात लातूरमधील ५१ रुग्णांचा समावेश आहे. तसेच निलंगा-५, देवणी-१, उदगीर-२, अहमदपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ५४.४ टक्के
ळजिल्ह्यात अलिकडे रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत ब-या होणा-या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट हळूहळू घसरत आहे. राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा रिकव्हरी रेट कमी आहे. जिल्ह्यातील एकूण २४६९ रुग्णांपैकी आतापर्यंत १३४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ५४.४ टक्क्यांवर आला आहे.

Read More  सुशांत प्रकरण व बिहार निवडणूक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या