24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरलातूर जिल्ह्यात आणखी ६९ रुग्णांची भर

लातूर जिल्ह्यात आणखी ६९ रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

१०१ जणांचा प्रलंबित, तर १०२ जणांचा अहवाल अनिर्णित

लातूर : जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, शुक्रवारी आणखी ६९ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून तपासणीसाठी आलेल्या ४२७ पैकी शुक्रवारी ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यापैकी ६९ रुग्ण जिल्ह्यातील, तर एक रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. दरम्यान, आज १४० जणांचा अहवाल निगेटिव्ह, १०१ जणांचा अहवाल प्रलंबित, १०२ जणांचा अहवाल अनिर्णित, तर १४ जणांचा अहवाल रद्द करण्यात आला आहे. आज जिल्ह्यात ६९ रुग्ण वाढल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १४२२ झाली असून, यापैकी ७९७ रुग्ण उपचारानंतर घरी परतले असून, ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यात आणखी ६९ रुग्ण सापडले. त्यात सर्वाधिक ४६ रुग्ण हे लातूर शहरातील आणि ३ रुग्ण तालुक्यातील आहेत, तर उदगीर तालुक्यातील ९, निलंगा तालुक्यातील ५, रेणापूर तालुक्यातील २ आणि अहमदपूर तालुक्यातील ३ आणि औसा तालुक्यातील १ रुग्ण आहे.

लातूर शहरात ब-याच भागात रुग्ण सापडत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ७ रुग्ण महसूल कॉलनीत सापडले. तसेच आनंदनगर, सावेवाडी, मोतीनगर, इस्लामपुरानगर, गवळी गल्ली, मेघराजनगर, जीएमसी रोड आणि शंकरपूरमनगरमध्येही एकपेक्षा अधिक रुग्ण सापडले. उदगीर तालुक्यात ९ पैकी विकासनगर-३, पोलिस स्टेशन-२, शिवशक्तीनगर-२, नांदेड रोडसह खंडागळी गल्लीत १ रुग्ण सापडला. निलंग्यातही ५ पैकी बँक कॉलनी-२, साठेनगर, चांदोरीवाडी, कासारशिरसी येथे, रेणापूर तालुक्यात कातळेनगर, दत्त मार्केट असे २ रुग्ण, अहमदपूर तालुक्यात शहरासह वांजरवाडी, सताळा येथे प्रत्येक ी १ असे ३ रुग्ण सापडले, तर औसा तालुक्यात उंबडगा येथे एक रुग्ण सापडला. आज सापडलेल्या जिल्ह्यातील ६९ रुग्णांपैकी ६७ रुग्ण हे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील, तर २ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १४२२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९७ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे, तर आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्या एकूण ५६३ रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असून, यातील तब्बल ५३१ रुग्णांची कोरोना लक्षणे सौम्य आहेत, तर २४ जणांना आॅक्सिजन देण्यात आला असून, ८ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

रॅपिड टेस्टमध्ये ५८ पैकी ९ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात रॅपिड टेस्टही सुरू असून, एकूण ५८ जणांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने जारी करण्यात आलेल्या अहवालातून देण्यात आली आहे.

३६ रुग्णांना सुटी

लातूर जिल्ह्यात शुक्रवारी बरे झाल्याने ३६ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यामध्ये लातूर शहरातील सर्वाधिक २२ रुग्णांना सुटी मिळाली असून, उदगीरमधील ८, देवणीमधील ५, चाकूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

शहरातील या भागातील आहेत रुग्ण

महसूल कॉलनी-७, सावेवाडी-३, जीएमसी रोड-२, शंकरपूरमनगर-२, आनंदनगर-४, इस्लामपुरानगर-२, गवळी गल्ली-२, मेघराजनगर-२, खोरी गल्ली, मोतीनगर-३, आदर्श कॉलनी, लीला रेसिडेन्सी, सिग्नल कॅम्प, कोल्हेनगर, रुपनगर, मेघराजनगर, न्यूभाग्यनगर, मजगेनगर, पटेलनगर, श्रीनगर, आदर्श कॉलनी, अजिंक्य सिटी, यासह पारुनगर आणि ठोंबरेनगर, मुरुड आणि एकुर्गा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

Read More  ऑगस्टपासून निर्बंध शिथिल ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या