लातूर : प्रतिनिधी
ट्वेन्टीवन अॅग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांनी लातूर येथील शिवाई ग्रुपच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय, सामाजिक, वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महीलांशी संवाद साधला. बुधवार दि. २७ जूलै रोजी दुपारी लातूर येथील शिवाई गृपच्या सर्व सदस्यांची ट्वेन्टीवन अॅग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा सहभाग होता. यावेळी उदयोग, व्यवसाय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सेद्रिय शेती, वन्सपती शेती संदर्भाने चर्चा उपस्थित महीलामध्ये चर्चा झाली. विविध विषयावर येथे सकारात्मक संवाद झाला. महीलांनी आपल्या कार्यरत असलेल्या क्षेत्रातील अनुभव सौ. अदिती अमित देशमुख यांना सागितले.
या बैठकीस शिवाई ग्रुपच्या अध्यक्ष डॉ. सौ. सुरेखा निलंगेकर, माजी अध्यक्ष सौ. सुरेखा काळे, सौ. डॉ. स्नेहल देशमुख, सौ. शुभांगी राऊत, सौ. मीना गायकवाड, सौ. शुभांगी राऊत, डॉ. सौ. दाताळ, संस्थेच्या समन्वयक संगिता मोळवणे, सौ. गीता पाटील, सौ. काळदाते यांच्यासह शिवाई ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.