19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeलातूरग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ तालुक्­यातील ११ ग्रामपंचायतींसाठी ३५ मतदान केंद्रांवर ग्रामपंचायतीसाठी आज रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १८४ प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, निवडणूक अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्यासह संबंधित मतदान केंद्रांवर रवाना झाले. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, नायब तहसीलदार तानाजी यादव, राहुल पत्रिके, सुधीर बिराजदार, झोनल अधिकारी डी. जी.सोनकांबळे, ए. ए. पागे, मंडळ अधिकारी तलाठी आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत तालुक्­यात ११ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या ११ जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्य पदाच्या ९५ जागेसाठी १६९ उमेदवार रिंगणात आहेत. यातून १५ उमेदवार बिनविरोध आले असून या अकरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १६ हजार ९५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नियुक्त निवडणूक अधिकारी व कर्मचारी तहसील कार्यालय शिरूर अनंतपाळ येथून शनिवारी मतदान साहित्य घेऊन रवाना झाले आहेत. कर्मचा-यांना मतदान केंद्रांवर जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी बु., वांजरखेडा बाकली, बेवनाळ, तळेगाव बोरी, हिसामाबाद,आरी, रापका,दैठणा,गणेशवाडी, अंकुलगा राणी या अकरा ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच व सदस्य पदासाठी निवडणुका होणार असून यासाठी आवश्­यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ग्रामपंचायती निवडणुका ग्राम पातळीवर संवेदशील असतात. त्यामुळे या निवडणुका शांततेत पार पाडव्यात यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली. तसेच मतदारांनी निर्भीड व नि:पक्षपणे मतदान करावे, असे आवाहनही तहसीलदार जटाळे यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या