29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeलातूरदहा पोलिस अधिका-यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या

दहा पोलिस अधिका-यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती कारनामुळे लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बदल्या केल्या आहेत. पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती बदल्यामध्ये नियंत्रण कक्षातील अरविंद पवार यांची उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली. उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपककुमार चुडामन यांची लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली. लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे गणेश कदम यांची लातूर शहर वाहतूक शाखेत बदली.

लातूर शहर वाहतूक शाखचे सुनिल बिर्ला यांची जळकोट पोलिस ठाण्यात बदली. जळकोट पोलिस ठाण्याचे परमेश्वर कदम यांची उदगीर शहर पोलिस ठाण्यात बदली. उदगीर शहर पोलिस ठाण्याचे गोरख दिवे यांची एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे संजीवन मिरकले यांची शिवाजी नगर पोलिस ठाण्यात बदली. नियंत्रण कक्षातील दिलीप डोलारे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली. शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्याचे रामेश्वर तट यांची नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. ज्या पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय, विनंती बदल्या झाल्या आहेत. त्यांनी बदलीच्या ठिकाणचा तात्काळ कार्यभार स्विकारावा, असे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या