26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूर३५१ ग्रामपंचायतीवर नेमले प्रशासक

३५१ ग्रामपंचायतीवर नेमले प्रशासक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेबर २०२२ मध्ये मुदत संपणा-या ३५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. जिल्हयातील मुदत संपलेल्या ३५१ ग्रामपंचायतीवर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्रशासक नेमले आहेत. नविन कारभा-यांची जोपर्यंत निवड होत नाही, तो पर्यंत या ग्रामपंचायतींचा कारभार हा प्रशासकाच्या मार्फत चालणार आहे.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेबर २०२२ मध्ये मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. त्यामुळे लातूर जिल्हयातील ३५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका महिणाभरात होणार असून या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य व सरपंच पदासाठी दि. २० डिसेंबर २०२२ रोजी थेट जनतेतुन निवड होणार आहे. या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले आहेत. यात लातूर तालुक्यातील ४४ ग्रामपंचायती, औसा तालुक्यातील ६० ग्रामपंचायती, रेणापूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायती, निलंगा तालुक्यातील ६८ ग्रामपंचायती, अहमदपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायती, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ११ ग्रामपंचायती, चाकूर तालुक्यातील ४६ ग्रामपंचायती, जळकोट तालुक्यातील १३ ग्रामपंचायती, तर देवणी तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्हयात ३५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका जाहिर करण्यात आल्या आहेत. या निवडणूकीच्या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे प्रशासन गतीमान रहावे, गावातील दैनंदिन कामे मार्गी लागावीत म्हणून विस्तार अधिकारी दर्जाच्या अधिका-यांची ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. मात्र या प्रशासकांच्या कालावधीत नविन कामे मंजूर होणार नाहीत. पूर्वी चालू असलेल्या योजनांना सुरू राहणार आहेत.

मासिक सभा होणार
ग्रामपंचायतींच्या दर महिण्याला सभा होत असतात. लातूर जिल्हयातील ३५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असल्याने तेथे विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी प्रशासक म्हणून नेमले आहेत. त्यांच्या मार्फत नियमित दैनंदीन कामे, पूर्वी चालू असलेल्या कामांना गती देणे, त्या महिण्याची ठराविक पध्दतीने मासिक सभा प्रशासक व ग्रामसेवक यांनी घ्यावयाची आहे. प्रशासकांना लाभार्थी निवड व नविन कामे सुरू करता येणार नाहीत., अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्र्य गिरी यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या ताब्यात
स्थानिक स्वराज्य संस्था या ग्रामीण विकासाचा केंद्र बिंदू आहेत. यात मार्च २०२१ मध्ये लातूर जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांची मुदत संपल्याने शासनाने या ठिकाणी मुख्यकार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमले. तर जिल्हयातील ७८६ ग्राम पंचायती पैकी ३५१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने या ग्राम पंचायतीवर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारी प्रशासक म्हणून नेमले आहेत. त्यामुळे कांही ग्रामपंचायतीचा आपवाद वगळता जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था आज घडीला प्रशासकांच्या ताब्यात आहेत. तसेच लातूर बाजार समितीचाही कालावधी संपल्याने या ठिकाणीही प्रशासक राज सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या