25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरशिरूर अनंतपाळ तालुक्यात ११ ग्रामपंचायतींवर प्रशासक

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ११ ग्रामपंचायतींवर प्रशासक

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणा-या ११ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून पंचायत समितीकडील विस्तार अधिकारी व शाखा अभियंत्यावर प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यातील पाच प्रशासकांना प्रत्येकी दोन तर एकांकडे एका ग्रामपंचायतीचा कार्यभार निवडणूक होईपर्यंत सांभाळावा लागणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात मुदत संपणा-या तालुक्यातील राणी अंकुलगा, अजनी बु. आरी, गणेशवाडी, तळेगाव बोरी, दैठणा, बेवनाळ, रापका, वांजरखेडा,बाकली, हिसामाबाद या अकरा ग्रामपंचायतींचा समावेश असून यांवर एकूण सहा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यातील दैठणा व राणी अंकुलगा ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी पं.डी.बी. व्होट्टे, आरी व अजनी बु. ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी व्ही.एस. मंडावले, तळेगाव बोरी व गणेशवाडी ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी ए.एस. गायकवाड, रापका व बेवनाळ ग्रामपंचायतींवर के.बी. खडबडे, वांजरखेडा व बाकली ग्रामपंचायतीवर कनिष्ठ अभियंता पी. एम.पौळकर तर हिसामाबाद ग्रामपंचायतीवर कनिष्ठ अभियंता आर. बी. हाटकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीची नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मुदत संपणार आहे. या अकरा ग्रामपंचायतीवर एकूण सहा प्रशासकांना ग्रामपंचायतींचा प्रशासकीय जबाबदारी देण्यात आली असून मुदत संपेल त्या दिवशी संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या