22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूरआजपासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया

आजपासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया

एकमत ऑनलाईन

लातूर : आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दि. ११ जून पासून सुरूवात होणार आहे. लातूर जिल्हयातील १ हजार ७४० जागेसाठी १ हजार ६०४ बालकांना मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे. या बालकांना आजपासून पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळणार आहेत.

अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना तसेच इतर संवर्गातील ज्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के (आरटीई) मोफत प्रवेशसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रीया दि. ३ मार्च पासून सुरू झाली होती. लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे नोंदणी झालेल्या २३८ शाळांनी २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. या नोंदणी झालेल्या २३८ शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गातील १ हजार ७४० जागेच्यासाठी पालकांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाच्या मोफत प्रवेशासाठी ४ हजार २४ ऑनलाईन अर्जांची नोंदणी केली होती. या मोफत प्रवेशासाठी राज्यस्तरावरून ऑनलाईन पध्दतीने लॉटरी काढण्यात आली. लातूर जिल्हयातील १ हजार ६०४ बालकांना इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी निवड झाली आहे.

ज्या बालकांना आरटीईची लॉटरी लागली आहे. त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकीत प्रती घेऊन शाळेत आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चीत करावा. प्रवेश घेतलेल्या बालकांच्या राहत्या घरापासून शाळे पर्यंतचे अंतर तपासले जाणार आहे. सदर अंतर चुकीचे दाखवले असल्यास अशा पालकांना तालुकास्तरीय समितीचा सामना करावा लागणार आहे. तसेच कोरोना काळात व लॉकडाऊन या कारणामुळे जे पालक प्रत्यक्षात शाळेत प्रवेशासाठी येऊ शकत नाहीत अशा बालकांच्या पालकांना विहित मुदतीत व्हॉअसप अन्य सोशल मिडियाच्याद्वारे संपर्क करावा लागणार आहे.

प्रवेश घेण्यासाठी २० दिवसाचा कालावधी
इयत्ता पहिलीच्या वर्गात आरटीईतंर्गत मोफत प्रवेशासाठी दि. ११ जून पासून सुरूवात होत आहे. सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २० दिवसाचा कालावधी म्हणजेच ३० जून पर्यंत वेळ असणार आहे. या विहित वेळेत जे पालक प्रवेश घेणार नाहीत. त्यांची संधी हुकणार आहे. तसेच जे पालक प्रतिक्षा यादीत आहेत. त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

पहिलीच्या प्रवेशासाठी लॉटरी
लातूर जिल्हयातील १ हजार ६०४ बालकांना आरटीईतंर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी निवड झाली आहे. यात लातूर तालुक्यातील ९४५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अहमदपूर तालुक्यातील ९७ बालके, चाकूर तालुक्यातील ६८ बालके, देवणी तालुक्यातील ३४ बालके, जळकोट तालुक्यातील ५ बालके, निलंगा तालुक्यातील १३५ बालके, रेणापूर तालुक्यातील २७, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १२ बालके, तर उदगीर तालुक्यातील २०५ बालकांचा इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी मोफत प्रवेशाची लॉटरी लागली आहे.

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या