34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूरबाधित ३४८९१, बरे झाले २८५५३

बाधित ३४८९१, बरे झाले २८५५३

एकमत ऑनलाईन

लातूर : उत्तर भारतातून दक्षिणेकडे निघालेले यात्रेकरु निलंग्यात १२ पैकी ८ जण कोरोनाबाधित निघाले. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आणि गेल्या वर्षभरात कोरोना संकटाशी दोन हात करीत असताना अनेक परिस्थितीने अनेक धडे घालून दिले. गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यात कोरोनाने ७६५ जणांना मृत्यू झाला. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आजघडीला १६७९ रुग्ण उपचार घेत आहेत. गृह विलगीकरणात ३८९४ रुग्ण आहेत. वर्षभरात जिल्ह्यात ३४ हजार ८९१ रुग्ण बाधित झाले असले तरी समाधानाची बाब म्हणजे २८ हजार ५५३ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतले आहेत.

हरयाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपुर झिरका येथे गत वर्षी धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले बारा यात्रेकरु २ एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील धार्मिकस्थळी आढळून आले होते. या १२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील ८ जण कोव्हीड पॉझिटिव्ह आले होते. या कोव्हीड पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तर अन्य ४ जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. संपूर्ण देशात कोरोनाचा उद्रेक सुरु होता. या यात्रेकरुंच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केला होता. गेल्या वर्षभरात कोरोनाने लातूर जिल्ह्यात चांगलेच पाय रोलवले आहेत. त्यामुळे २२ मार्च २०२० पासून लातूर जिल्ह्याला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले होते. वर्षभरात अनेक चढउतार लातूर जिल्ह्याने अनुभवले आहे.

आजघडीला जिल्ह्यात दररोज साडेतीन हजार व्यक्तींची कोरोचा चाचणी केली जात आहे. पॉझिटिव्ह येणा-या रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत लातूर जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ५७३ हून अधिक झाली आहे. कोविड रुग्णालय व सेंटरमध्ये उपचार घेणा-यांपैकी होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आजघडीला ५ हजार ५७३ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. ज्यांना स्वत:च्या घरात स्वतंत्र जागा व वैद्यकीय अधिका-यांचे हमीपत्र असलानंतरच होम आयसोलेशनची परवानगी दिली जात आहे. अशी परवानगी घेवून घरात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या कोविड सेंटरमधील रुग्णांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात डीसीएचसी सेंटरची संख्या ४० आहे. पैकी ३२ सेंटरमध्ये १६७९ रुग्ण दाखल आहो तर १२ कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. होम आयसोलेशनमध्ये ३८९४ रुग्ण दाखल आहेत.

राज्यात दिवसभरात ५२ हजार ७४ नवे रुग्ण; २२२ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या