25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरदिवाळीनंतर किलबिलाटाने शाळा गजबजल्या

दिवाळीनंतर किलबिलाटाने शाळा गजबजल्या

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
दिवाळीच्या १९ दिवसाच्या दिर्घ सुट्टया नंतर गुरूवार दि. १० नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांचे उत्साहाच्या वातावरणात आमन झाले. विद्यार्थ्यांच्या आगमनाने दिवाळीत ओस पडलेल्या शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटे गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांनी शाळांना भेटी देवून उपस्थितीची पाहणी केली.

या वर्षी लातूर जिल्हयातील शाळांना दि. २२ ऑक्टोबर ते ९ नोव्हंबर या कालावधीत १९ दिवसाच्या सुट्या लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून जाहिर करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या सुट्यामध्ये अभ्यासा बरोबरच किल्ले बनवणे, पहाणे, पोहणे, ऐतिहासिक वास्तूंना भेटी देत प्रवासाचाही आनंद लुटला. दिवाळीत गोडधोड करंजी, लाडू, चिवडा, चकल्यांचाही विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. तसेच गावाकडे खो-खो, क्रिकेट आदी खेळांचाही आनंद घेतला.

लातूर जिल्हा परिषदेच्या जिल्हयात १ हजार २७६ शाळा दिवाळीच्या सुट्टया संपताच बुधवारी सुरू झाल्या. सुटयानंतर विद्यार्थी पहिल्यांदाच शाळेत आले. शाळेत येताच पुन्हा आपल्या वर्ग मित्रांच्या भेटी गाठीने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता. जिल्हयात पहिल्याच दिवशी शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. शाळेची पहिली घंटा कानावर पडताच आपण शाळेत शिक्षकांच्या शिकवणीत विद्यार्थी आभ्यासामध्ये रममान झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या