22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरकडक लॉकडाऊनच्या घोषणेनंतर...शहरात उसळली गर्दी

कडक लॉकडाऊनच्या घोषणेनंतर…शहरात उसळली गर्दी

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात दि. ८ ते १३ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. ६ मे रोजी काढला. या कडक लॉकडाऊनच्या घोषणेमुळे शुक्रवारी लातूर शहरात अक्षरश: गर्दी उसळली होती. गंजगोलाई, भूसार लाईन आडत बाजारात किराणा व भूसार मालाच्या खरेदीसाठी एकच गर्दी झालेली होती. प्रचंड गर्दी होत असतानाह पोलीस प्रशासनाला सकाळचे ११ वाजण्याची प्रतिक्षा करावी लागली. ११ वाजल्यानंतर मात्र बाजारपेठ बंद झाली आणि गर्दी ओसरली.

‘ब्रेक द चेक’ अंतर्गत कोविड-१९ विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजाा म्हणून जिल्ह्यात दि. १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. आठवड्यातील शनिवार व रविवार (वीकेंड लॉकडाऊन) ची कडक अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात लागु करण्यात आली होती. तरी आठवड्यातील शनिवार व रविवार या वीकेंड लॉकडाऊनप्रमाणे दि. ८ ते १३ मे या कालावधीत कडक निर्बंध लागुू करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या सहा दिवसांत केवळ वैद्यकीय सेवा सुरु राहील असे सांगण्यात आल्याने शुक्रवारी सकाळी ७ वाजता बाजारपेठ उघडताच नागकांनी किराणा व भूसार मालाच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

गंजगोलाईन, भूसार लाईन, शिवाजी मार्ग, मस्जिद रोड, नांदेड रोड, मेन रोड, महात्मा बसवेश्वर चौक, सराफ लाईन, आडत बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली होती. खाद्यपदार्थ, बेकरी, पाव, किराणा, अन्नाधान्य, तेल, दाळी, खरेदीसाठी गर्दी झाली होती. याशिवाय शहराच्या विविध भागातील किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, खाद्य तेलाची दुकाने गर्दीने हाऊसफुल्ल होती. गर्दीत अनेकांना मास्कचा विसर पडला होता. फिजिकल डिस्टन्सचाही विसर पडलेला दिसून आला. ठरावीक वेळेत किराणा, भूसार मालाची खरेदी करण्याची धावपळ होती. त्यामुळे अनेक रस्ते वाहतुकीने तुंबले होते. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली.

…आणि प्रशासनानेही खुलासा केला नाही
दि. ८ ते १३ मे या कालावधीत सर्वच म्हणजेच जीवनावश्यक वस्तुंची दुकानेही बंद राहणार आहेत. फक्त वैद्यकीय सेवा सुरु राहणार, असे वॉटस्अ‍ॅपवर व्हायरल झाले. ते कोणी व्हायरल केले. त्यात तथ्य आहे काय? याचा खुलासा प्रशासकीय पातळीवरुन झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी शहरात भूसार व किराणा मालाच्या खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती.

मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हणजे तिघाडी सरकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या