मांजरी : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील मांजरी या गावी दिवसातून तीनवेळा एस. टी. नियमितपणे येत होती. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात ती बंद झाल्याने नागरीकांची गैरसोय होत होती. दि. ८ जून रोजी ती सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती.
नागरीकांची ही आडचन विचारात घेऊन एस. टी महामंडळाचे लातूरचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर व डेपो मँनेजर युवराज थडकर यांनी २५ जून पासून लातूर-मांजरी बस सुरू केली. एसटी बस गावात येताच ग्रामस्थांनी तिचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच संबंधीत अधिकारी व कर्मचा-यांचे आभार मानले. यावेळी विजय चव्हाण, भीमा धूमाळ, रमेश सुरवसे, मारूती काळे, युनुस शेख यासह अनेक ग्रामस्थ उपस्थीत होते. या लालपरीच्या आगमनामुळे शालेय विद्यार्थी, गोरगरीब नागरीक, शेतकरी मात्र यांची सोय होणार आहे.
तब्बल अडीच वर्षानंतर मांजरीत लालपरी आल्याने ग्रामस्थात आनंद
एकमत ऑनलाईन