24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरलातुरात पुनश्च लॉकडाऊन

लातुरात पुनश्च लॉकडाऊन

मनपा क्षेत्रात १ ते १५ ऑगस्टदरम्यान कडकडीत बंद कायम, न. प. क्षेत्रात १ ते ७ ऑगस्टदरम्यान नियम शिथिल, अत्यावश्यक सेवेस मुभा

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा १८७९ दि. १३ मार्च २०२० पासून लागु करुन खंड २, ३, ४ मधील तरतूदीनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. केंद्र शासनाकडून दि. २२ मार्च २०२० पासून लॉकडॉऊन घोषीत करण्यात आले होते व त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये सदरचे लॉकडाऊन दि. ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आले होते. तद्नंतर दि. ३१ ऑगस्टपर्यंत १ ते १५ , १ ते ७ व ८ ते ३१ ऑगस्ट असे तीन टप्प्यांत लातूर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. याबाबतचे नवे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी जारी केले आहेत.

परिशिष्ट ‘अ’ मध्ये लॉकडाऊनच्या १ ते १५ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात

 • भाजीपाला व फळांची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील.
 • झोमॅटो, स्विगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहिल.
 • सार्वजनिक, खाजगी, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बगीचे संपूर्णपत: बंद राहातील तसेच सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक प्रतिबंधीत राहील.
 • उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स (कोविड-१९ करीता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत: बंद राहतील.
 • सर्व केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर दुकाने पुर्णत: बंद राहातील, मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादी विक्री बंद राहातील.
 • शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग बंद राहातील.
 • सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोनचाकी, तीन चाकी, चार चाकी बंद राहातील तथापी अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनांचा वापर अनुज्ञेय राहील.
 • सार्वजनिक बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर बंद राहातील तथापी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करणारे लातूर मनपा, पोलीस, राज्य, केंद्रीय विभागाचे कर्मचारी व वाहने अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशामधून वगळण्यात आले आहे.
 • सर्व प्रकारचे बांधकाम, कंस्ट्रक्शनची कामे संपूर्णत: बंद राहातील तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल तेथे काम सुरू राहतील.
 • सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक उद्योग, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह बंद राहातील.
 • मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ बंद राहातील. केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय असेत. अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
 • सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मीक कार्यक्रम व सभा बंद राहातील. धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळे बंद राहातील. लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद राहातील.
 • परिशिष्ठ ‘ब’ मध्ये नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचाय क्षेत्रात दि. ८ ते ३१ ऑगस्टपर्यंत, उर्वरीत ग्रामीण भागात दि. १ ते ३१ ऑगस्टपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा नियमित अनुज्ञेय वेळेनूसार सुरु राहातील.
 • अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व आस्थापना, बाजरापेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहातील. मॉल आणि मार्केट कॉम्पलेक्स सकाळी ९ ते सायंकाळी ७ यावेळेत दि. ५ ऑगस्टपासून सुरु राहातील.
 • मॉलमधील फुड कोर्ट, रेस्टॉरंटस् फक्त घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. तसेच कोविड-१९ चा प्रादूर्भाव पसरु नये यासाठीच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. सिनेमागृह बंद असेल.
 • जिल्ह्यातंर्गत बससेवा ५० टक्के क्षमतेनूसार सुरु राहील, शारिरीक अंतर राखणे व निर्जंतुकीकरण करण्याची दक्षता घेणे बंधनकारक राहील.
 • आंतर जिल्हा हालचाली, वाहतूक पुर्वीप्रमाणेच निर्बंधासह सुरु राहील.
 • खुल्या मैदानात शारिरीक क्रियाकलाप, व्यायाम, शारिरीक अंतराचे पालन करुन परवानगी राहील.
 • वृत्तपत्र छपाई व वितरण सुरु राहील. सर्व शैक्षणिक संस्था बंद राहातील. तथापी शैक्षणिक संस्थांचे कर्मचा-यांना कार्यालयीन व संशोधन कामासाठी मुभा असेल.
 • केश कर्तनालये, स्पा, ब्यूटी पार्लर, सलून सुचनांच्या पालनाच्या अधिन राहून सुरु ठेवता येतील. दुचाकीवर दोन व्यक्ती दोघांना हेल्मेट व मास्क आवश्यक, तीनचाकी वाहनांत एक अधिक दोन, चार चाकी वाहनात तीन अधिक एक प्रवास करु शकतील.

लातूर शहर वगळून दि. १ ते ७ ऑगस्टदरम्यान या गोष्टी सुरू राहतील

 • परिशिष्ठ ‘ब’ मध्ये १ ते ७ ऑगस्टच्या लॉकडाऊनच्या दुस-ाा टप्प्यात नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात सर्व किराणा, भाजीपाला, बेकरी व फळांची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहातील.
 • किराणा, भाजीपाला, बेकरी साहित्य व फळांची सकाळी ९ वाजेपर्यंत ठोक विक्री करता येईल. ठोक विक्री फक्त किरकोळ विक्रेत्यांच्यासाठी असेल. सदर ठिकणी प्रत्यक्ष नागरिकांना प्रवेश नसेल.
 • मटन, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. शिवभोजन थाळीचे उपहारगृह नियमित वेळेनूसार सुरू ठेवण्यात येतील.
 • अत्यावश्यक सेवेशी निगडीत नसलेले कारखाने, उद्योग सुरू ठेवता येतील. पाणीपुरवठा जार, टॅकर सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहातील.
 • वाहनांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर आणि गॅरेज सुरू ठेवता येतील.
 • मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ पुर्णत: बंद राहातील. नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय असेल. तसेच अंत्यविधीसाठी २० व्यक्ती उपस्थित राहण्यास परवानगी असेल.

लातूर शहर व लगतच्या गावांत निर्बंधासह या बाबी सुरू राहतील

 • लातूर शहर व लगची गावे गंगापूर, पेठ, चांडेश्वर, खोपेगाव, कव्हा, कातपूर, बाभळगाव, सिकंदरपूर, बसवंतपूर, खाडगाव, पाखरसांगवी, कोळपा, हरंगुळ बु., बोरवटी, मळवटी, वरवंटी, आर्वी, वासनगाव, हणमंतवाडी, महाराणाप्रतापनगर हद्दीत दि. १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत किराणा मालाचे किरकोळ व सुपर मार्केट दुकानदरांना दुपारी १२ वाजेपर्यंत दुकान न उघडता घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल.
 • दुध विक्री व वितरण सकाळी १० वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील. तथापी दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनूसार सुरु ठेवला येईल. सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांचे नियमीत वेळेनूसार सुरु राहातील.
 • सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांच्या नियमित वेळेनूसार सूरु राहातील व कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना अत्यावश्यक सेवा नाकारणार नाही. अन्यथा संबंधीत संस्था कारवाईस पात्र राहील.
 • ऑनलाइर््न औषध वितरण सेवा व दवाखान्याबाबत असलेली औषध विक्री दुकाने दि. ३१ ऑगस्टपर्यंत २४ तास सुरु ठेवता येतील. इतर ठिकाणी असलेली औषधी दुकाने दि. १५ ऑगस्टपर्यंत सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
 • ई-कॉमर्स सेवा घरपोच सुरु राहातील.
 • सर्व न्यायालये, राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम, स्थानिक संस्थेची कार्यालये शासन निर्देशानूसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील.
 • पेट्रोलपंप, गॅसपंप सुरु राहातील. परंतू, अत्यवश्यक पोलीस, आरोग्य विभाग, शासकीय विभाग यांनाच इंधन पुरवठा करण्यात येईल. एलपीजी गॅस सेवा घरपोच राहील. सॉ-मील, लाकडाचे दुकान स्मशानभूमीच्या बाजूला असेल तरच सुरु ठेवता येणार आहे.
 • औद्योगीक व इतर वस्तूची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक शासकीय नियमानूसार सुरु राहील.
 • दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल, प्रिंटमिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानूसार सुरु राहातील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी ६ ते ९ यावेळेतच अनुज्ञेय राहिल.
 • पाणीपुरवठा करणारे टँकरला नियमानूसार परवानगी राहील. संस्थात्मक अलगीकरण, विलगीकर व कोविड केअर सेंटर करीता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानूसार सुरु राहातील.
 • सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका नियमानूसार किमान मनुष्यबळासह सुरु राहातील. संपूर्ण लातूर जिल्ह्यातील न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, सरकारी कर्मचारी, इतर कर्मचारी, डॉक्टर, नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, वर्तमानपत्र, प्रिंटींग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, मेडीकल शॉप कर्मचारी, दूध विक्रेते, कृषी बी, बियाणे, खते, गॅस, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता करणारे कर्मचारी, खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, वीज कर्मचारी, मनपा, पोलीस, महसूल कर्मचारी यांना स्वत: करीता दुचाकी वाहन वापरता येईल.
 • औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानूसार सुरु राहातील. अन्न प्रक्रिया उद्योग, शेतीमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योग, कारखाने सुरु ठेवता येतील.
 • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी वर्क फॉम होमचा पर्याय वापरावा, सर्व वैद्यकीय, व्यवसायीक, परिचारीक, पॅरामेडीकल कर्मचारी सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका यांना जिल्हातंर्गत वाहूकीसाठी परवानगी राहील.
 • वृद्ध व आजारी व्यक्तिकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहातील.
 • स्वस्त धान्य दुकाने सुरु राहातील. सुपर मार्केट बंद राहातील.
 • शिवभोजन थाळी उपहारगृह बंद राहातील.
 • पाणीपुरवठा जार, टँकर दुपार १२ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

Read More  वाळू तस्करांना जिल्हाधिका-यांचा झटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या