19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeलातूरआक्रमकता काँग्रेसचा स्थायीभावच

आक्रमकता काँग्रेसचा स्थायीभावच

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : प्रतिनिधी
पाचशेच्यावर राजांना पळता भुई थोडी करणा-या इंग्रजांना महात्मा गांधीच्या आक्रमकतेमुळे देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे. आजही राहूल गांधी नीडरपणे भारत जोडो यात्रा करीत आहेत त्यामुळे काँग्रेस आक्रमक नाही, असे म्हणने सर्वार्थाने चुकीचे असल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश सचिव अभय साळुंखे यांनी केले. शहरातील संस्कृती लॉन्स मध्ये दि.१५ रोजी हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ आणि नूतन तालुकाध्यक्ष डॉ.गणेश कदम यांनी आयोजित केलेल्या स्रेह मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते भारत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी जि.प. अध्यक्ष घुमनवाड, रमेश सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, डॉ.अशोक सांगवीकर, एकनाथ पाटील, प्रवीण पाटील, शरद देशमुख, सिराज जहागीरदार, कालिमोदीन अहमद, देवानंद मुळे, अनिल चव्हाण, श्रीकांत बनसोडे, केदार काडवादे, सतीश क्षीरसागर, पप्पूभाई शेख, शिवाजी जंगापल्ले, रघुनाथ मदने आदी उपस्थित होते.

यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. गणेश कदम यांनी दुस-यांदा नियुक्ती केल्याबद्दल श्रेष्ठींचे आभार मानून शेतकरी आणि कष्टक-यांच्या न्याय व हक्कांसाठी अविरतपणे लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. लातूरचे माजी महापौर तथा पक्षाचे निरीक्षक विक्रांत गोजमगुंडे यांनी पक्ष मतदारसंघातील नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले. याच कार्यक्रमात एन.एस.यु.आय.चे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, कालिमोदीन अहमद,श्रीकांत बनसोडे,भारत रेड्डी, निलेश देशमुख,सिराज जहागीरदार यांनीही आपले विचार व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना निवडणुका स्वबळावर लढायच्या की आघाडी करुन हे स्थानिक नेतृत्वाने ठरवायचे असून जरी स्वबळावर लढल्या तर पक्षपातळीवरुन ‘संपूर्ण शक्ती देण्याचे व पाठबळ पुरविण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गणेश कदम यांनी, सूत्रसंचालन जीवन नवटक्के यांनी तर आभार हेमंत माकणे यांनी मानले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी हेमंत माकणे, निलेश देशमुख, अनिल शेळके, बापुराव गोखरे, बापू शिंदे ,किशोर मोरे, हंसराज सोमवंशी, समीर शेख, उत्तम टेकाळे, विजय नरवटे, प्रदीप डावरे,अल्ताफ शेख,शरद भदाडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यकर्त्यांची बहू संख्येने उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या