21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeलातूरलातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन

एकमत ऑनलाईन

लातूर : केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. पेट्रोल, डीझेल, घरगूती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जी.एस.टी मुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्रसरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्यदलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे.

या सर्व बाबींचा व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार, दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजी लातूर शहरातील काँग्रेस भवन समोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध म्हणून चुलीवर स्वयंपाक करून महिला काँगेस या आंदोलनात सहभागी झाली.

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अँड. किरण जाधव, सौ. स्मिता खानापुरे, सौ. सपना किसवे, डॉ. सुधीर पोतदार, गोरोबा लोखंडे, विजयकुमार साबदे, लक्ष्मण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, अँड. देविदास बोरूळे पाटील, रमेश सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, प्रा.प्रवीण कांबळे, प्रा. सुधीर आनवले, ज्ञानेश्वर सागावे, शरद देशमुख, तबरेज तांबोळी, युनूस मोमीन, सचिन मस्के, आसिफ बागवान, जब्बार पठाण, केशरताई महापुरे, सुलेखाताई कारेपूरकर, ज्ञानोबा गवळे, शीतल मोरे, आबासाहेब पाटील, सचिन बंडापल्ले, बालाजी एम.साळुंके, दत्ता सोमवंशी, नागसेन कामेगावकर, नामदेवराव इगे, प्रा. एम. पी. देशमुख,

कलीम शेख, इसरार पठाण, सचिन गंगावणे, यशपाल कांबळे, अभिजित इगे, हमीद बागवान, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, अक्षय मुरळे, विजय टाकेकर, अमित जाधव, कुणाल वागज, राजू गवळी, अराफत पटेल, युनूस शेख, करीम तांबोळी, पवनकुमार गायकवाड, अजय वागदरे, शैलेंश भोसले, जय ढगे, अशोक सूर्यवंशी, मेनोद्दीन शेख, अमोल गायकवाड, जमालोद्दीन मणियार, पिराजी साठे, धनजय शेळके, धनराज गायकवाड, प्रमोद जोशी ,सायरा पठाण, सत्यवान कांबळे, राहुल कांबळे, बाप्पा मार्डीकर, राजाभाऊ गायकवाड, संदीपान सूर्यवंशी, मुश्ताक पटेल, अभिषेक देशमुख, खाजपाशा शेख, काशिनाथ वाघमारे, रामकीशन गडीमे, संजय बिराजदार, रणधीर सुरवसे, अजित सूर्यवंशी, संजय खंडापूरकर, लक्ष्मण मोरे, सुशील खरोसे, विष्णुदास धायगुडे, मंगेश वैरागे, आकाश भागवत, खुनमिर मुल्ला, भागवत माळी, अँड.विकास सूळ, शेख अस्लम, शेख हुसेन, सचिन सूर्यवंशी, अजय यादव, बाळासाहेब करमुडे, सौ कमल शहापुरे, सुमन चव्हाण, कमलताई मिटकरी, मंदाकिनी शिखरे, मीनाताई टेकाळे, मिनाज पठाण, संजय ओहोळ, काशिनाथ केंद्रे, रामराजे काळे, सय्यद अमन आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या