18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरमांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेती जलमय

मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे शेती जलमय

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : मांजरा नदीवरील प्रकल्पातून पाणी सोडल्याने मांजरा नदीला पुर आल्यामुळे मांजरा नदी काठची व त्याला लागून असलेल्या ओढ्याकाठची संपूर्ण शेती जलमय झाली आहेत.उभ्या पिकांत पाणी शिरल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर वरील पिके पाण्यात असून हाता तोंडाशी आलेला घास या कृत्रीम संकटाने हिरावला जातो की काय या भितीने शेतकरीचिंतागृस्त झाला आहे.

सप्टेबर मध्ये सततच्या दमदार पावसाने जिल्ह्सरतील लघुंिसचन, साठवण व पाझर तलाव, मध्यम प्रकल्प, मांजरा नदीवरील धनेगाव प्रकल्प व बॅरेज तुडूंब भरले आहेत.परिणामी पाणी अधिक झाल्याने प्रकल्पातून मांजरा नदी पाणी सोडण्यात आले, त्यात तालुक्यातील प्रकल्प व नदी, नाले वाहत असल्याने मांजरा परिसर अक्षरश: जलमय झाला असून हजारो हेक्टर वरील पिके पाण्यात गेल्याने खरीप हंगाम धोक्यात आले आहे. मांजरा नदीपात्रात पाणी जास्त झाल्याने ते नदी बाहेर पडले असून मांजरा काठच्या फकरानपूर, वांजरखेडा,हालकी, डोंगरगाव, उजेड बिबराळ,बाकली यांसह राणी अंकुलगा शिवारातील शेतात पूर स्थितीने हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आली असून काढणीला आलेले सोयाबीनचे उत्पादन धोक्यात आले आहे.

पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी
या पुरामुळे हजारो हेक्टरवरील खरीप पिके पाण्यात गेली असून खरीप हंगाम धोक्यात आले आहे. तर नगदीचे पीक अशी ओळख असलेले सोयाबीन पाण्यात गेल्याने शेतक-यावर आर्थिक संकट कोसळले असून विमा कंपनी व शासनाने शेतक-यांना निकष व अटीच्या फे-यात न अडकव तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पूरगृस्त शेतक-यातून केली जात आहे

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या