22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरकृषिमंत्री अब्दुल सत्तार औसा तालुक्यात शेतक-यांच्या बांधावर

कृषिमंत्री अब्दुल सत्तार औसा तालुक्यात शेतक-यांच्या बांधावर

एकमत ऑनलाईन

औसा : दुबार पेरणीनंतर शंखी गोगलगायीने सोयाबीन फस्त केले आहे. आमच्याकडे सरकारने बघाव…..मदत करावी, अशी आर्त हाक औसा तालुक्यातील शेतक-यांनी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे. शंखी गोगलगायीने फस्त केलेल्या सोयाबीनची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी औसा तालुक्यातील एरंडी, सारोळा, जयनगर येथे शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली .यावेळी त्यांच्या सोबत औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे हे उपस्थित होते यावेळी अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांशी संवाद साधला.

शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढीपर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून ती लवकरच यावर उपाययोजनेसाठी निर्णय देईल. हे एन डी आर एफ च्या कक्षेत बसत नसले तरी केंद्राकडे पाठपुरावा करु तसेच पंतप्रधान पीक विम्याच्या कक्षेत कसे बसवता येईल आणि अधिकाधिक मदत कशी देता येईल याबाबत शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांंना सांगितले. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर, कृषी विभागाचे सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, विभागीय जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र पाटील हेउपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार यांनीही शंखी गोगलगाय कशी सोयाबीन फस्त करते याची चित्रफितही दाखविली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या