जळकोट (प्रतिनिधी) : यंदा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात खूप पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, महाराष्ट्र सरकारने पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते ते काही ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत तर ज्या ठिकाणी पंचनामे केले नाहीत अशा ठिकाणी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकारी तसेच कर्मचारी थेट शेतक-यांच्या शेतात जाऊन माहिती घेत आहेत. जी जळकोट तालुक्यात किती आहे तीच स्थिती महाराष्ट्रात असून, कॅबिनेटमध्ये हा विषय ठेवून शासनाच्या वतीने लवकरच शेतक-यांना मदत करण्यात येणार आहे. केंद्र सरकारला ही विनंती करण्यात येऊन त्यांचे पथक महाराष्ट्रात पाठवावे व पिकांच्या नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी वांजरवाडा येथे दिली.
जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, सोयाबीन काढणीच्या हंगामात, पाऊस कोसळत असल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी जळकोट तालुक्यातील वांजरवाडा या गावातील शेतक-यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन दि २७ संप्टेबर रोजी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली, तसेच लवकरच मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी शेतक-यानी दोनदा सोयाबीनची पेरणी केली आहे आता अशी अवस्था झाली आहे तेव्हा सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामचंद्र अदावळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्मथ किडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी ताकबीडे, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य संतोष तिडके ,तहसीलदार संदीप कुलकर्णी ,गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुभाष काटे, जिल्हा उपप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, शिवसेना तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, संभाजी गोरखे, गोंिवद भ्रमना ,दत्ता इंदुरे, विनोद गुरमे , तलाठी तानाजी भंडारी, विमा प्रतिनिधी बारवाड युवा सेना तालुका प्रमुख उमाकांत इमडे , विलास पवार, शंकर धोंडापुरे ,बालाजी थोंटे, ज्ञानेश्वर भांगे, अनिल ढोबळे, मन्मथ बोदले , अभंग मोठे , बालाजी ठाकूर, बालाजी कांबळे , शेतकरी म्हेत्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.
पंचनामे त्वरित करण्याची कृषीमंत्र्यांकडे मागणी
मराठवाड्यात गेल्या आठवडाभराच्या अति पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे आज मराठवाड्याच्या र्दौयावर आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता कृषी मंत्री आले असता आमदार बाबासाहेब पाटील यांनी त्यांचे यांनी त्यांना शेतक-यांच्या प्रश्नासंदर्भात तसेच अहमदपूर -चाकूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नासंदर्भात निवेदने दिली.
यात प्रामुख्याने मतदारसंघाचा समावेश पोखरा योजनेत करून मतदारसंघाच्या गावातील जनतेला न्याय द्यावा अशी प्रमुख मागणी केली, त्याचबरोबर अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ऊस सोयाबीन अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे यासंदर्भात शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना योग्य ती मदत देण्याची विनंती आमदार बाबासाहेब पाटील यांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांकडे केली. त्याच बरोबर मतदार संघातील झालेल्या नुकसानीचा आढावा आमदार बाबासाहेब पाटील यांनी माननीय कृषिमंत्री समोर सादर केला . यावेळी कृषीमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत या मतदारसंघात झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले व मराठवाड्यातील शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न या राज्याचा कृषीमंत्री म्हणून करणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे-शरद पवार भेट; नव्या चर्चेला विषय मिळाला