अहमदपूर : अहमदपूर नगर परिषदेवर काँग्रेस पक्ष विशेष लक्ष असून आम्ही कोणत्याही पक्षासोबत येथे आघाडी करणार नसल्याचे सांगून येथील नगरपरिषदेची निवडणूक स्व:बळावर लढवून येथे काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याची ग्वाही काँग्रेस पक्षाचे प्रभारी तथा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, तालुकाध्यक्ष अॅड. हेमंतराव पाटील, जिल्हा सरचिटणीस सांबाप्पा महाजन, डॉ.गणेश कदम, कलिमोद्दिन अहमद, देवानंद मुळे सिराजोद्दीन जागीरदार, राजीव पाटील,शहराध्यक्ष विकास महाजन, बाबासाहेब देशमुख, अक्षय देशमुख, सय्यद मुजम्मिल, भारत रेड्डी, रमेश सूर्यवंशी, संतोष चव्हाण, विजय निटुरे आदी उपस्थित होते.
गोजमगुंडे बोलते वेळी सांगितले की, काँग्रेस पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून येथे स्वत:च्या ताकतीवर सर्व २५ उमेदवार उभे करणार असल्याचे सांगुन यांना पक्षाचे बळ मिळणार असल्याचे सांगीतले. या शहरातील ज्येष्ठ मंडळी, नेते, डॉक्टर ,वकील, उद्योजकांना भेटण्यासाठी व त्यांच्याकडून पक्षांना सहकार्य मिळवण्यासाठी पक्षाचे अभियान राबविण्यिात येणार असल्याचे सांगून येथील २७ टक्के जागा ओबीसी समाजासाठी देण्यात येणार आहेत तर दलित, अल्पसंख्यांकांना व सुशिक्षीत आणि तरुणांना येथे संधी देणार व त्यांना काँग्रेस पक्षाचे बळ मिळणार असल्याचेही यावेळी वेळी सांगितले.
बोलताना गोजमगुंडे म्हणाले की, या शहरात अनेक समस्या आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी पंधरा दिवसानंतर येते, रस्ते खोदलेले व खराब झालेले आहेत, शहरातील कच-याची समस्या भयावह आहे ,कबरस्थानचा प्रश्न, लहान व ज्येष्ठांसाठी बगीच्याची सोय नाही, सार्वजनिक स्वच्छालय नाही आदी महत्त्वाचे मुद्दे घेऊन नगर परिषदेला सामोरे जाणार आहोत. या शहरातील जनतेला काँग्रेस पक्षाचा आश्वासक सत्तास्थान मिळणार असून येथे काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आल्याचे आपणास दिसणार असल्याचेही शेवटी सांगितले.