22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरअहमदपूर रोटरी क्लबकडून ३० शिक्षकांना पुरस्कार

अहमदपूर रोटरी क्लबकडून ३० शिक्षकांना पुरस्कार

एकमत ऑनलाईन

अहमदपूर: येथील रोटरी क्लबच्या वतीने तालुक्यातील उपक्रमशील व तंत्रस्रेही ३० शिक्षकांचा नेशन बिल्डर अवार्ड देऊन यथोचित सन्मान मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे व गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या हस्ते करण्यात आला. मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवन कापसे व सचिव कपिल बिरादार हे उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रा. बबनराव बोडके, शशिकांत भरडे, सय्यद समदपाशा, केशव काचे, वर्षा पत्की, महादेव होनराव, रमाकांत बिलापट्टे, धनाजी उजनकर, पुष्पा जाधव, रणजीत चौधरी, ज्ञानेश्वर जवळे, मनोहर ढेले, संजीवनी गुरमे, मुजीद शेख, सागर राजपूत, मीना मुंडे, रमाकांत कोसलगे, जयप्रकाश हराळे, कामाक्षी पवार, राजू भुरे, सय्यद अली हसन, मनोहर कवडेकर, रमाबाई साखरे, बालाजी सावळे, माधुरी व्यवहारे, परवेज शेख, अंजली कुलकर्णी, अविनाश जाधव, दत्तात्रय सोनवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.द.मा. माने यांच्या आठवणीचं मोहोळ या पुस्तकाचे व प्रा.शिवशंकर पाटील यांनी रोटरीचे मुखपृष्ठ द प्लेजचे विमोचन करण्यात आले.

यावेळी शिक्षक आमदार काळे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, रणजीत चौधरी, कामाक्षी पवार यांची समायोजित भाषणे झाली. प्रस्ताविक कपिल बिरादार, सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी तर आभार प्रा. शिवशंकर पाटील यांनी मानले. प्रोजेक्ट चेअरमन म्हणून आशिष हेंगणे यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या