22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरलातूरच्या कन्येची हवाईसुंदरी भरारी

लातूरच्या कन्येची हवाईसुंदरी भरारी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याच्या चित्रपट परिक्षण महामंडळाचे सदस्य, माजी नगरसेवक नागसेन कामेगावकर व माजी नगरसेविकास योजना कामेगावकर यांची कन्या भूमिका कामेगावकर हिने हवाईसुंदरी म्हणून भरारी घेतली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. शहरातील श्रीमान योगी प्राथमिक शाळेत प्राथमिक, मुक्तेश्वर विद्यालयात माध्यमिक, दयानंद विज्ञान महाविद्यालयात उच्च माध्यमिक तर बीएससी कॉम्प्युटरचे शिक्षण कॉकसीट महाविद्यालयात झालेली भूमिका कामेगावकर हिला सुरुवातीपासूनच वेगळे काही तरी करण्याची मन:स्वी ईच्छा होती. त्यामुळे तिने शिक्षण सुरु असतानाच ‘एरोडायनामिक’ या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला.

मात्र तिला प्रवेश मिळाला नाही. खचून न जाता तिने ‘कॅबिन क्रू’(हवाईसुंदरी) होण्याचा निश्चय केला. नागपूर येथे हेमंत सुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कॅबिन क्रू’ची तयारी केली. इंडिगो एअर लाईन्समध्ये जागा निघाल्या. भूमिकाने इंडिगो एअर लाईन्समध्ये इंटरव् ूव दिला आणि तिची निवडही झाली आणि गुरगाव, हरियाना येथे इंडिगो एअर लाईन्सच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारत सरकारकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत ती उर्त्तीर्ण झाली आणि तिची पोस्टींग हैदराबात इंडिगो एअर लाईन्स येथे झाली. पायलट होण्याची ईच्या असलेल्या भूमिकेचा येत्या वर्षभरात पायलट होण्याचा तिचा मानस आहे.

हवाईसुंदरी म्हणून आपल्या पहिल्या उड्डानाविषयी भूमिका म्हणाली, ४० जण इंडिगो एअर लाईन्सच्या विमानात बसले होते. माझ्या टिममधील सदस्य त्यांच्याशी इंग्रजी, हिंदीतून संवाद साधत होते तर ते प्रवासी मराठीत बोलत होते. ते पाहूण मी त्या प्रवाशांकडे गेले आणि मी स्वत: त्यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधला. तेव्हा ते सर्व प्रवाशी हैदराबादहून तिरुपतीला जात होते विशेष म्हणजे ते सर्वजण लातूरचे होते. मीसुद्धा लातूरचीच आहे, असे जेव्हा मी त्यांना सांगीतले, तेव्हा त्यांनी माझे खुूप कौतूक केले. भूमिका कामेगावकर हिच्या या यशाबद्दल बाळकृष्ण धायगुडे, रमेश नरवटे, दिलीप सोरडगे, अनिल नरवेटे, एजाज शेख, सुधीर बिराजदार यांनी अभिनंदन केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या