21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूररेणा कारखान्यामुळे शेतकरी कुटुंबीयांना विमान प्रवास

रेणा कारखान्यामुळे शेतकरी कुटुंबीयांना विमान प्रवास

एकमत ऑनलाईन

रेणापूर: तालुक्यातील डीघोळ देशमुख येथील ७३ऊस उत्पादक शेतकरी हे सहकुटुंब हैदराबाद ते तिरुपती असा विमानाने प्रवास करून तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. हा विमान प्रवास केवळ सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व रेणा सहकारी साखर कारखान्यामुळे शक्य झाल्याची भावना ऊस उत्पादक शेतक-यांंनी व्यक्त केली.

लोकनेते विलासराव देशमुख व माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी रेणापूर तालुक्यातील निवाडा येथे रेणा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. सामान्य शेतकरी हा केंद्रंिबंदू मानून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू झाली. सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख शेतक-यांना म्हणायचे , तुम्ही फक्त स्वप्न पहात रहा, आम्ही स्वप्न पूर्ण करू. अगदी तसेच घडले आहे. रेणा कारखान्याच्या परिसरातील शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. दरवर्षी ऊसाला उच्चांकी भाव मिळाला. यावर्षी तर ऊसाचे क्षेत्र खूप असूनही सर्व ऊसाचे गाळप होईल की नाही अशी शेतक-यांंच्या मनात शंका होती पण मांजरा परिंवारातील सर्व कारखान्यांचे गाळपाचे योग्य नियोजन केले व पूर्ण ऊस गाळप केला व मांजरा परिवारातील सर्वच कारखान्यांनी उच्चांकी दर दिला.

त्यामुळे रेणापूर तालुक्यातील डीघोळ देशमुख येथील शेतक-यांनी तिरुपती बालाजी दर्शन विमानाने प्रवास करून घ्यावयाचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रेणा कारखान्याचे संचालक स्रेहलराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ७३ शेतक-यांनी चक्क सहकुटुंब विमानाने हैदराबाद ते तिरुपती बालाजी असा प्रवास केला. तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन ते सुखरूप परतले. हा योग सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख व रेणा कारखान्यांमुळे आल्याची भावना व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या